योगा करण्याआधी वार्म अप आणि संपल्यानंतर कूल डाउन होणे गरजेचे आहे. यामुळे लवचीकता वाढण्यासह दुखापत होण्यापासून दूर राहता.
योगाभ्यास करण्याची उत्तम पद्धत म्हणजे एखाद्या तज्ज्ञाकडून शिका. जेणेकरुन योगा करताना दुखापत होणार नाही.
योगा करताना स्वत:ला हाइड्रेट ठेवणे गरजेचे आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या. जेणेकरुन योगा करताना एखाद्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
एखादी दुखापत झाल्यानंतर कधीच योगा करू नये. अन्यथा दुखापत बरी होण्यास वेळ लागू शकतो.
योगा करताना श्वसनावर लक्ष केंद्रित करणे फार महत्वाचे आहे. कधीच योगा करताना श्वास रोखून धरू नये.