सार
वर्ष 2024 मध्ये जगाने काही गंभीर आजारांचा सामना केला. या आजारांमध्ये लाखो नागरिकांच्या आरोग्याला फटका बसण्यासब जागतिक स्तरावर आरोग्य यंत्रणेवरही दबाव पडला गेला.
5 most dangerous dieses in 2024 : वर्ष 2024 मधील सध्या अखेरचा महिना सुरू आहे. काही दिवसानंतर वर्ष 2025 चे स्वागत केले जामार आहे. अशातच यंदाच्या वर्षात कोणत्या आजारांचा प्रकोप राहिला होता याबद्दल जाणून घेणार आहोत. वर्ष 2024 मध्ये जगाने काही नव्या गंभीर आजारांचा सामना केला. या आजारांमुळे लाखो नागरिकांचे आयुष्य प्रभावित झाले. याशिवाय आरोग्य यंत्रणेवरही ताण पडला गेला.
कोव्हिड-19 चा XBB व्हेरिएंट
वर्ष 2024 मध्य कोरोना व्हायरसचा कहर पुन्हा दिसून आला. कोरोनाचा नवा व्हेरिएंट XBB ने जगभरात पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली. या व्हेरिएंटमुळे लसीचा प्रभाव कमी झालाच पण काहींना आपला जीव गमवावा लागला होता. कोरोनाच्या XBB व्हेरिएंटचा सर्वाधिक फटका लहान मुलं आणि वयोवृद्धांना बसला होता.
डेंग्यू
वर्ष 2024 मध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसल्याचे दिसून आले होते. पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली होती. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशननुसार, 30 एप्रिल 2024 पर्यंत 7.6 दशलक्षांहून अधिक डेंग्यूच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. याशिवाय 3 हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.
निपाह व्हायरस
भारतातील दक्षिण क्षेत्रात मुख्यत: केरळमध्ये निपाह व्हायरसचा प्रकोप पहायाला मिळाला. निपाह व्हायरल वटवाघूळ आणि डुक्करांच्या माध्यमातून फैलावला जातो. कोरोनाप्रमाणेच निपाह देखील एक संक्रमित आजार आहे. यामध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.
झिका व्हायरस
झिका व्हारसचा कहर केवळ भारत नव्हे तर जगातील काही देशांमध्ये दिसून आला. झिका व्हायरस एडीज एजिप्टी डास चावल्यानंतर फैलावला जातो. झिका व्हायरसमध्ये ताप येणे, डोके दुखी, स्नायूंचे दुखणे अशी काही सामान्ये लक्षणे दिसून येतात.
मंकीपॉक्स
वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनच्या मते, 12 जून 2024 पर्यंत जगभरात मंकीपॉक्सची 97,281 प्रकरणे समोर आली होती. याशिवाय जगभरात मंकीपॉक्सच्या कारणास्तव 208 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
आणखी वाचा :
2024 मधील 6 ट्रेन्डी Nude Lipstick Shades, तुमच्याकडे आहेत का?
थंडीच्या दिवसात उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी अशी घ्या काळजी