थंडीच्या दिवसात तापमानात घट झाल्याने वातावरण थंडावले जाते. या काळात आरोग्यासंबंधित काही समस्याही उद्भवतात. यावेळी उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी काळजी कशी घ्यावी हे पाहूया.
उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी थंडीत वेळच्या वेळी औषधांचे सेवन करावे.
थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार वस्र परिधान करावेत.
थंडीत शरिराची हालचाल मंदावली जाते. अशातच थंडीच्या दिवसात शारिरीक हालचालीसाठी हलक्या स्वरुपाचा व्यायाम करू शकता.
सर्दी-खोकल्याचा परिणाम उच्च रक्तदाबावर होऊ शकतो. यामुळे आरोग्याची वेळीच काळजी घेण्यास विसरू नका.
थंडीच्या दिवसात मीठाचा वापर करण्यात आलेल्या पदार्थांपासून दूर रहावे. यामुळे उच्च रक्तदाब वाढला जाऊ शकतो.
थंडीच्या दिवसात पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.