सार
World Theatre Day : जगभरात आज (27 मार्च) जागतिक रंगमंच दिवस साजरा केला जात आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या थीमवर आधारित हा दिवस साजरा होतो. जाणून घेऊया जागतिक रंगमंच दिवसाचा इतिहास आणि यंदाच्या थीमबद्दल सविस्तर...
World Theatre Day History : देशातच नव्हे तर जगभरातील कलाकारांसाठी जागतिक रंगमंच दिवस अत्यंत खास असतो. प्रत्येक वर्षी 27 मार्चला जागतिक रंगमंच दिवस साजरा केला जातो. याशिवाय प्रत्येक वेळी एक नवी थीम यासाठी ठेवली जाते. जाणून घेऊया जागतिक रंगमंच दिवस का साजरा केला जातो, याचा इतिहास आणि यंदाची थीम याबद्दल सविस्तर...
जागतिक रंगमंच दिवस इतिहास
जागतिक रंगमंच दिवसाची सुरुवात वर्ष 1962 मध्ये झाली. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय थिएटर इंस्टीट्यूटकडून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आयटीआय एक आंतरराष्ट्रीय संघटना असून, जी नाटकाच्या जगातील संस्कृती आणि कलेला प्रोत्साहन करते. रंगमंचाचे महत्व सांगण्यासाठी जागितक रंगमंच दिवसाची सुरुवात झाली होती. या दिवसाच्या माध्यमातून नाटकामधील कला आणि त्याच्या भविष्याबद्दल आपले विचार मांडण्यासाठी पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. वर्ष 1962 मध्ये जॉन कोटेक्यू यांनी रंगमंचासाठी पहिला संदेश दिला होता, जो 50 हून अधिक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला होता. याशिवाय शेकडो वृत्तपत्रांमध्ये छापण्यात आला होता.
यंदाची थीम काय?
जागतिक रंगमंच दिवसाचे महत्व सांगण्यासाठी, यासंबंधित कलाकारांना सन्मानित करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी याची सुरुवात करण्यात आली होती. यंदाच्या वर्षाची जागतिक रंगमंच दिवसाची थीम "थिएटर अँड कल्चर ऑफ पीस" (Theatre and culture of peace) अशी ठेवण्यात आली आहे.
या दिवसाचा मुख्य उद्देश, नाटकाच्या जगातील विविधता आणि संस्कृतीची देवाणघेवाण याला प्रोत्साहन देणे. हा दिवस जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. जागतिक रंगमंच दिवसानिमित्त नाटकातील मंडळी एकत्रित येतात आणि यामध्ये आपले योगदान देतात.