MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Women Safety : महिलांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव बॅगेत ठेवाव्यात या 6 वस्तू

Women Safety : महिलांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव बॅगेत ठेवाव्यात या 6 वस्तू

गेल्या अलीकडल्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच तुम्ही एखाद्या ठिकाणी एकटे प्रवास करताना स्वत:ची सुरक्षितता कशी करावी याबद्दल जाणून घेऊया. 

2 Min read
Author : Chanda Mandavkar
| Updated : Aug 21 2024, 09:36 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
महिलांसाठी सेफ्टी टूल्स
Image Credit : google

महिलांसाठी सेफ्टी टूल्स

महिलांना एखाद्या ठिकाणी एकटे प्रवास करताना नेहमीच सुरक्षिततेची चिंता सतावत असते. अलीकडल्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे पालक आपल्या मुलींना घराबाहेर पाठवण्यास देखील घाबरतात. देशात एका बाजूला कोलकातामधील महिला डॉक्टरची हत्या आणि बलत्कार प्रकरण तर दुसऱ्या बाजूला बदलापूरमधील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या घटनेने नागरिक संतप्त आहेत. अशातच तुम्ही एकटे प्रवास करत असाल अथवा तुमची मुलगी एखाद्या ठिकाणी एकटी जात असल्यास तिच्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. खरंतर, तरुणींसह महिलांनी आपल्या बॅगेत काही सेफ्टी टूल्स ठेवल्या पाहिजेत. जेणेकरुन आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास त्या वस्तूंचा वापर स्वत:च्या सुरक्षिततेसाठी करता येईल.

27
सेफ्टी पिन
Image Credit : our own

सेफ्टी पिन

महिलांनी आपल्या हँडबॅगेत सेफ्टी पिन नेहमीच ठेवावा. सेफ्टी पिन बॅगेत ठेवत नसाल तर आजपासूनच ठेवण्यास सुरुवात करा. सेफ्टी पिन दैनंदिन गोष्टींसाठी कामी येण्यासह महिलांच्या सुरक्षिततेसाठी नक्कीच कामी येईल.

37
आपत्कालीन मोबाइल क्रमांक
Image Credit : Google

आपत्कालीन मोबाइल क्रमांक

एखाद्या अज्ञात ठिकाणी अथवा रात्रीच्या वेळेस एकट्याने प्रवास करत असल्यास सोबत आपत्कालीन क्रमांक असावेत. मोबाईलमध्ये क्रमांक सेव्ह करण्यासह एखाद्या लहानश्या डायरीमध्ये देखील क्रमांक लिहून ठेवावेत. तुम्हाला प्रवास करताना असुरक्षितता वाटत असल्यास आपत्कालीन क्रमांकावर फोन अथवा तुमचे लाइव्ह लोकेशन पाठवू शकता.

47
पेपर स्प्रे
Image Credit : Facebook

पेपर स्प्रे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्वात बेस्ट प्रोडक्ट म्हणजे स्प्रे. खरंतर, मिर्ची स्प्रे बद्दल बहुतांशजणांना माहिती आहे. याचा वापर महिला स्वत:च्या सुरक्षिततेसाठी करू शकतात. स्प्रे मध्ये वेगवेगळे प्रकार देखील येतात. हल्लेखोरावर स्प्रे चा वापर केल्यानंतर त्याचा प्रभाव 30 ते 40 मिनिटे राहतो. स्प्रे वेगवेगळ्या आकारात येतात. जेणेकरुन तुम्ही पॉकेट ते पर्समध्ये सहज ठेवू शकता.

57
स्विस नाइफ
Image Credit : Facebook

स्विस नाइफ

महिलांनी स्वत: च्या सुरक्षिततेसाठी हँडबॅगेत लहान चाकू ठेवावा. ही वस्तू नेहमीच तुम्हाला मदत करेल. स्विस नाइफच्या मदतीने एखाद्याने तुमची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर कामी येईल. स्विस नाइफचे टोक अणूकुचीदार असते.

67
ट्रेजर गन
Image Credit : Facebook

ट्रेजर गन

ट्रेजर गनच्या माध्यमातून गोळ्या निघत नाहीत. पण टेजर गनचे बटण दाबल्यानंतर त्यामधून करंट निघतो. ही गन बॅटरीवर चालते. एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर हल्ला केल्यास तुम्ही ट्रेजर गनचा वापर करू शकता. काही देशांमध्ये ट्रेजर गनचा वापर पोलिसांकडून केला जातो. ऑस्ट्रेलिया ट्रेजर गन सोबत ठेवणे बेकायदेशीर आहे.

77
एंजल विंग अलार्म
Image Credit : Facebook

एंजल विंग अलार्म

एंजल विंग अलार्म बॅगेत ठेवावा. यामधून निघणाऱ्या ध्वनीमुळे हल्लेखोराच्या कानठळ्या नक्कीच बसतात. एंजल विंग अलार्मच्या ध्वनीचा आवाज 400 मीटरपर्यंत ऐकू येऊ शकतो. एखाद्या समस्येत तुम्ही अडकल्यानंतर एंजल विंग अलार्मचे बटण दाबल्यानंतर त्याचा आवाज दूरवर असणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचला जाऊ शकतो. यामध्ये वेगवेगळी आवाजाची क्षमता असणारे एंजल विंग अलार्म तुम्हाला खरेदी करता येतील.

आणखी वाचा : 

अंड की पनीर, कोणत्या पदार्थातून मिळते अधिक प्रोटीन?

डोकेदुखीवर आजीच्या बटव्यातील खास उपाय, लावा लवंगाचे तेल

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
कॉलेज तरुणींसाठी खास हेअरस्टाइल, गुबगुबीत मुलींवर दिसतील छान
Recommended image2
Horoscope 4 February : या राशीच्या लोकांना घसा-कानांचे विकार, तर या राशीच्या कौटुंबीक जिवनात कलह!
Recommended image3
एलोंगेटेड आय मेकअपमुळे गोल चेहरा दिसेल स्लिम शार्प, 5 टिप्स
Recommended image4
मुलींसाठी हेअरस्टाईल: लहान केस असलेल्या मुलींसाठी 6 हेअरस्टाईल
Recommended image5
खऱ्या चांदीचे बेबी ब्रेसलेट: बचतीसह मजबूत, स्लीक सिल्व्हर कडा डिझाइन
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved