अंड की पनीर, कोणत्या पदार्थातून मिळते अधिक प्रोटीन?
- FB
- TW
- Linkdin
)
प्रोटीनचा उत्तम स्रोत
प्रोटीन शरिराच्या विकासासाठी सर्वाधिक महत्वपूर्ण पोषण तत्त्वांपैकी एक आहे. प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये अंडी आणि पनीरचे सेवन करणे सर्वाधिक उत्तम मानले जाते. पण काहींच्या मनात असा प्रश्न उद्भवतो, शरिराला उच्च प्रमाणात प्रोटीन मिळण्यासाठ अंड की पनीर, या दोघांपैकी कोणता पदार्थ बेस्ट आहे. खरंतर, अंड आणि पनीर खाण्याची पद्धत आणि त्यामधील पोषण तत्त्वे वेगवेगळी असतात. याबद्दलच सवस्तर जाणून घेऊया…
अंड्यामधील प्रोटीनचे प्रमाण
अंड्याला संपूर्ण प्रोटीनचा स्रोत मानले जातो. म्हणजेच अंड्यात सर्व 9 आवश्यक अमिनो अॅसिड असतात, जे शरिर स्वत:हून तयार करू शकत नाही. अंड्यात जवळजवळ 6 ग्रॅम प्रोटीन असते. याशिवाय अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई, बी12, लोह आणि झिंक देखील असते. दरम्यान, अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण थोडे उच्च असल्याने काहीजणांसाठी समस्या निर्माण होऊ शकते.
पनीरमधील प्रोटीनचे प्रमाण
अंड्याप्रमाणे पनीरमध्येही उच्च प्रमाणात प्रोटीन असतात. 100 ग्रॅम पनीरमध्ये जवळजवळ 18 ग्रॅम प्रोटीन असते, जे अंड्याच्या तुलनेत अधिक आहे. याशिवाय पनीर कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत मानला जातो. याचा फायदा शरिरातील हाडांना होतो. अंड्याच्या तुलनेत पनीरमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. पण पनीर पचण्यास थोडे कठीण होऊ शकते. खासकरुन लॅक्टोजपासून अॅलर्जी असणाऱ्या व्यक्तींना पनीर खाल्ल्याने समस्या उद्भवू शकते.
अंड खाण्याची पद्धत
अंड्याचे वेगवेगळ्या प्रकारे सेवन करता येते. अंड सकाळी नाश्ता, दुपारच्या जेवणात अथवा रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता. काहींना अंड उकडवून, तळलेले अथवा ऑम्लेटही आवडते. काही गोड पदार्थांमध्ये देखील अंड्याचा वापर केला जातो.
पनीरचा असा करा वापर
पनीरपासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात. पनीरचा पराठा, भाजी, पकोडे अशा रेसिपी केल्या जातात. गोड पदार्थांमध्येही पनीरचा वापर केला जातो.
अंड आणि पनीर खाण्याचे फायदे-तोटे
- शरिरातील स्नायूंच्या बळकटीसाठी अंड आणि पनीर दोन्ही पदार्थ खाऊ शकता. अंड्याच्या माध्यमातून शरिराला प्रोटीनसह आवश्यक फॅट्सही मिळतील, जे स्नायूंसाठी फायदेशीर ठरतील.
- वजन कमी करण्यासाठी पनीर एक बेस्ट पर्याया आहे. यामध्ये कॅलरीज आणि वसाचे प्रमाण कमी असते.
- शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात ठेवायचा असल्यास अंड्याच्या सफेद भागाचे सेवन करावे. यामधील पिवळा भागाचे कमी प्रमाणात सेवन करा.
पनीर की अंड? दोघांमधील बेस्ट ऑप्शन
अंड आणि पनीर दोन्ही पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. पण आहारासंबंधित गरजा आणि प्राथमिकतेनुसार तुम्ही अंड अथवा पनीरची निवड करू शकता. संपूर्ण प्रोटीन आणि अन्य आवश्यक पोषण तत्वांसाठी अंड्याचे सेवन करु शकता. पण शरिरात वसा आणि कॅलरीज कमी ठेवायच्या असल्यास पनीर उत्तम पर्याय आहे.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
डोकेदुखीवर आजीच्या बटव्यातील खास उपाय, लावा लवंगाचे तेल
ओव्हरइटिंग पासून दूर राहण्यासाठी 5 खास टिप्स, अपचनाची समस्याही होणार नाही