खजूर खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

| Published : Mar 21 2024, 12:09 PM IST / Updated: Mar 21 2024, 12:10 PM IST

dates

सार

रमजान महिन्यात उपवास करणारे लोक सकाळी सूर्योदयापूर्वी सेहरी करतात. त्यानंतर सूर्यास्तानंतर उपवास सोडला जातो. याला इफ्तार म्हणतात. उपवास सोडण्यासाठी खजूर जास्त प्रमाणात वापरतात.

सध्या रमजानचा महिना सुरु आहे.रमजान महिन्यात दिवसभर रोजा ठेवल्यानंतर सायंकाळी इफ्तारमध्ये खजूर असतेच. खजूर खाल्याने शरीराला पटकन ऊर्जा मिळते; कारण दिवसभर उपवास केल्यावर एनर्जी लेव्हल कमी होते म्हणून खजूर खाल्ले जातात. याशिवाय खजूर पचनक्रियेसाठीही खूप चांगला असतो. यासोबत वर्षभर खजूरचा आहारात समावेश केला जातो. खजूर हे एक अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे. त्यामुळेच ते जगभरात सर्वत्र आवडीने खाल्ले जाते. आरोग्यासाठी उपयुक्त असणारी अनेक अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे खजुरात असतात. खजूर हे मधुर, शीत गुणात्मक आणि वात-पित्त कमी करणारे आहे. ते खाल्ल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. अँटी-ऑक्सिडंटमुळे डायबेटिस, अल्झायमर डिसीजचा धोका कमी होतो. खजूर खाणे हे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते. गरोदरपणातही ते उपयुक्त असतात.

पचनशक्ती सुधारते :

खजुरामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. यामुळे पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. जेव्हा तुमच्या शरीरातील पचनकार्य सुरळीत सुरू असते तेव्हा तुम्हाला पोटाच्या तक्रारी कमी प्रमाणात जाणवतात. बद्धकोष्ठता अथवा अपचनाच्या समस्या असलेल्या लोकांना नेहमी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजुरामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात. खजूर खाण्याचे फायदे अनेक आहेत. यासाठी दररोज रात्री दोन खजूर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा.

हृदयासाठी उत्तम :

खजुरामध्ये असलेले फायबर्स हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. यामध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअमदेखील असते. एखाद्या व्यक्तीने दररोज १०० ग्रॅम मॅग्नेशिअम असलेले पदार्थ सेवन केले तर त्याला हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला हृदयाचे आरोग्य सांभाळायचे असेल तर आहारात खजूर अत्यंत आवश्यक आहे.

हाडांसाठी गुणकारी :

खजुरात सेलेनियम, मँगनीज, तांबे, मँग्नेशिअम, भरपूर असल्याने हाडांसाठी अत्यंत गुणकारी आहे. तसेच यामुळे हाडे मजबूत आणि लवचिक राहण्यास मदत होते.

आणखी वाचा :

Overthinking : डोक्यातील सततच्या विचारांनी ग्रासले असाल तर हे नक्की वाचा

International Day of Forests 2024: वृक्ष सन्मानाचा दिवस ,वृक्ष आपल्याला सगळं देतात आपण त्यांना काय देतो ?

Gudi Padwa 2024 : यंदा गुढीपाडवा कधी? जाणून घ्या शुभू मुहूर्तासह पूजा-विधी