सार

आजकाल प्रत्येक जण ओव्हरीथिंकींगने ग्रासला आहे. कोणते न कोणते विचार सतत मनात आणि डोक्यात सुरूच असतात यामुळे मानसिक आणि शारीरिक परिणाम शरीरावर होतो याची जण अनेकांना नसते त्यामुळे असं काही तुमच्या सोबत देखील होत असेल तर नक्की वाचा.

 

लाईफस्टाईल डेस्क :  आज कालच्या प्रत्येकाच्या कामाच्या पद्धती आणि त्यातून येणार ताण आपल्या शरीरावर परिणाम करतो. त्याच बरोबर अनेकांना घरातील प्रॉब्लेम्स तर दुसरीकडे अपेक्षांचे ओझे पूर्ण करण्याचा ताण. यामुळे अनेकांच्या डोक्यात याविषयी किंवा इतर कारणांमुळे डोक्यात विचार सुरु असतात.अगदी आपल्याबाबतीतही असं होत असत यात काही शंका नाही.

आता आपलंच बघा मुलींचं वाढत वय पाहून अनेक पालक लग्नासाठी मागे लागतात, तसच मुलांच्या बाबतीतही होतं. "अरे तुझं लग्न कधी व्हायच" असं अनेक जण सहज म्हणून जातात पण त्याचा तो व्यक्ती खोलवर विचार करायला सुरुवात करतो आणि अनावधानाने तेच तेच विचार त्याच्या डोक्यात यायला सुरुवात होते. हे झालं एक उदाहरण असे आपल्या अवतीभोवती अनेक उदाहरण आहेत.

तर अनेकाकांच्या मनात भविष्याच्या चिंतेने मन चलबिचल होते. याचाच अर्थ तुम्ही ओव्हरीथिंकिंगनी ग्रासले आहात.अशा ओव्हरथिंकिंगमधून ही स्वतःची सुटका करून घेता येते. पण त्यासाठी स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे. त्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्न केला पाहिजे.

ओव्हेरिथिंकींग वर मात कशी करायची ?

  • जेव्हा आपल्याला वाटेल आपण खूप जास्त विचार करत आहोत त्याक्षणी हातातील काम सोडून दुसरे काम केले पाहिजे जेणेकरून लक्ष विचलित होईल आणि ते विचार विसरता येतील.
  • मनात निर्माण झालेल्या चिंतेला दूर करण्यासाठी दीर्घश्वास घ्या,अशाप्रकारच्या मनातली चिंता विरून जाते.
  • आपल्या श्वसनावर लक्ष केंद्रित केल्यानं मनाची भूतकाळ किंवा भविष्यकाळ याकडे धाव घेण्याची सवय आपोआप कमी होते.
  • पुढच्याच क्षणी तेच विचार मनात आले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.
  • वेळेवर झोप घेणे आणि आहार वेळेत असणे हे देखील महत्वाचे आहे.
  • मेडिटेशन मुळे काही प्रमाणात या विचारांपासून सुटका मिळते आणि मन शांत राहतं. 

आणखी वाचा :

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका अधिक आताच जाणून घ्या कशामुळे होतं ? आणि त्यासाठी उपाय कोणते

केरळात सहा हजार जणांना Chickenpox चा संसर्ग, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

36 गुण जुळले पण आरोग्याचे काय? लग्न करण्याआधी दोघांनी कराव्या या टेस्ट