सार
सध्या मोमोज लहान मुलांची फेव्हरेट रेसिपी आहे. दिल्ली ते मुंबईतील एखाद्या तरी फूड स्टॉलवर मोमोजची विक्री केली जाते. घरच्याघरी रेस्टॉरंटसारखे पण मैद्याचा वापर न करता मोमोज तयार करण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
Momos Recipe in Marathi : मोमोज एक तिबेटियन रेसिपी असून भारतात खूप प्रसिद्ध आहे. खासकरुन दिल्ली, मुंबई आणि उत्तर भारतातील बहुतांश ठिकाणी मोमोज आवडीने खाल्ले जातात. यामध्ये मोमोजचे वेगवेगळे प्रकारही येतात. अशातच घरच्याघरी रेस्टॉरंटसारखे पण मैद्याशिवाय मोमोज कसे तयार करायचे याची रेसिपी जाणून घेऊया...
सामग्री
- एक वाटी बारीक चिरलेला कोबी
- दोन वाटी गव्हाचे पीठ
- एक वाटी बारीक चिरलेला गाजर
- एक बारीक चिरलेला कांदा
- आलं
- लसूण
- मीठ
- पाव चमचा काळी मिरी,
- पाव चमचा लाल तिखर
- एक चमचा सोया सॉस
- एक चमचा तेल
कृती
- सर्वप्रथम गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये पाव चमचा मीठ आणि तेल घालून मळून घ्या. गव्हाचे पीठ मऊसर असू द्या.
- गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल गरम करा. यामध्ये चिरलेला कांदा, आलं, लसूण घालून भाजून घ्या. यामध्ये बारीक चिरलेला कोबी, गाजरही घालून परतून घ्या. 5 मिनिटानंतर सोया सॉय, काळी मिरी पावडर आणि लाल तिखट घाला. सर्व सामग्री व्यवस्थितीत तेलात परतून घ्या. सर्व सामग्री भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
- गव्हाच्या पीठाचे लहान गोळे तयार करुन लाटून घ्या. यामध्ये मोमोजसाठी तयार केलेले सारण भरुन शेप द्या.
- गॅसवर स्टिमवर ठेवून 10-15 मिनिटांसाठी मोमोज स्टीम करा. एका प्लेटमध्ये काढून सॉस किंवा चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
आणखी वाचा :