MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Weight Loss Tips : 120Kg वजनाच्या तरूणीने घटवलं 64Kg वजन, वाचा तिची फॅट टू फिट जर्नी

Weight Loss Tips : 120Kg वजनाच्या तरूणीने घटवलं 64Kg वजन, वाचा तिची फॅट टू फिट जर्नी

Health Care: सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे विविध आजार मागे लागतात. त्यापैकीच एक म्हणजे लठ्ठपणा. एका तरूणीने तब्बल 64Kg वजन कमी कसे केले आणि ते कसे शक्य झाले? जाणून घेऊया सविस्तर…

3 Min read
Chanda Mandavkar
Published : Nov 29 2023, 11:56 AM IST| Updated : Nov 29 2023, 02:21 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
120 किलोवरून 56Kg ची झाली तरूणी
Image Credit : Getty

120 किलोवरून 56Kg ची झाली तरूणी

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात.यासाठी डाएट ते शारीरिक व्यायामाचे विविध प्रकार केले जातात. पण ब्रिटेन मधील विरल, मर्सीसाइड येथे राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरूणीने तब्बल 64 किलो वजन कमी केले. महिलेच्या वेट लॉस ट्रांसफॉर्मेशनमुळे सोशल मीडियात तिच्याबद्दल सध्या जोरदार चर्चा केली जात आहे. हन्ना तोसी (Hannah Tosi) असे तिचे नाव आहे. 

एक काळ असा होता की हन्नाचे वजन 120 किलो ग्रॅमपर्यंत पोहोचले होते. पण आज हन्नाचे वजन 56 किलो ग्रॅम इतके आहे.आठ महिन्याच्या आत हन्नाचे ट्रांसफॉर्मेशन पाहिल्याने सर्वजण चक्रावले आहेत. एवढ्या लवकर वजन कमी करणे कसे शक्य आहे? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उद्भवला असेल. 

28
लाइफस्टाइल
Image Credit : Getty

लाइफस्टाइल

हन्ना असे म्हणते, वजन वाढण्यामागे कारणीभूत तिची बिघडलेली लाइफस्टाइल होती. हन्ना दिवसभरात 4 हजार कॅलरीजचे सेवन करायची. फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ हन्ना खायची. याशिवाय चॉकलेट्स , वेफर्स असे पदार्थ ही दिवसभर खायची. यामुळे हन्नाचे वजन दिवसागणिक वाढत गेले होते. एक वेळ अशी आली, हन्नाला कारमधील सीट बेल्ट देखील लावता येत नव्हता. कारमध्ये बसताना हन्नाला त्रास व्हायचा. कारण वजन वाढल्यामुळे हिप्स आणि पोट अति प्रमाणात वाढले गेले होते.

38
"स्वत:बद्दल लाज वाटायची"
Image Credit : Getty

"स्वत:बद्दल लाज वाटायची"

हन्ना पुढे असे म्हणते, तिला वाढलेल्या वजनामुळे फार त्रास होऊ लागला होता. यासाठी हन्ना देवाला दोषी ठरवत होती. आरसा पाहायची तेव्हा हन्ना शारीरिक आणि मानसिक रूपात स्वत:लाच ओळखू शकत नव्हती. यामुळे स्वत:ची हन्नाला लाज वाटत होती. चारचौघांमध्ये जाण्यापासून हन्ना दूर रहायची.

48
गॅस्ट्रिक शस्रक्रिया
Image Credit : Getty

गॅस्ट्रिक शस्रक्रिया

हन्नाने वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी गॅस्ट्रिक शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. खरंतर गॅस्ट्रिक शस्रक्रिया वजन कमी करण्यासाठी केली जाते.ब्रिटेनमध्ये गॅस्ट्रिक शस्रक्रिया करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात.यासाठी हन्नाने तुर्कीत जाऊन गॅस्ट्रिक शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.यासाठी हन्नाने 3 लाख 36 हजार 811 रूपये खर्च केले.

58
वेगाने वजन कमी झाले
Image Credit : Getty

वेगाने वजन कमी झाले

तुर्की येथून गॅस्ट्रिक शस्रक्रिया केल्यानंतर तिचे वजन वेगाने कमी होऊ लागले. कारण हन्नाने खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवले होते. कमी जेवल्यानंतर देखील हन्नाला पोट भरलेले वाटायचे. हन्नाचे वजन अवघ्या आठ महिन्यात 56 किलो झाले.

 हन्ना बालपणापासूनच वाढलेल्या वजनाच्या समस्येचा सामना करत होती. 2019 मध्ये हन्ना 15 वर्षाची असताना तिने युकेमध्ये (UK) गॅस्ट्रिक बँडिंग (गॅस्ट्रिक शस्रक्रियेचा एक प्रकार) केले होते. त्यानंतरही हन्नाचे वजन वाढले गेले. गॅस्ट्रिक शस्रक्रिया करण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता असे हन्नाने म्हटले.

68
गॅस्ट्रिक शस्रक्रियेचे दुष्परिणाम
Image Credit : Getty

गॅस्ट्रिक शस्रक्रियेचे दुष्परिणाम

गॅस्ट्रिक शस्रक्रियेचे काही दुष्परिणाम देखील आरोग्यावर होतात. शरीरात फार मोठे बदल होऊ लागतात. शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्याने एनिमियाच्या समस्येचा हन्नाने सामना केला. पण गॅस्ट्रिक शस्रक्रिया केल्यानंतर मानसिक त्रासातून स्वत: सावरल्याचे हन्नाने म्हटले आहे. स्वत:हून वजन कमी करण्यास समस्या येत असल्यास गॅस्ट्रिक शस्रक्रियेचा विचार करू शकता असा सल्ला हन्नाने दिला.

78
 एक्सरसाइज आणि हेल्दी डाएट
Image Credit : Getty

एक्सरसाइज आणि हेल्दी डाएट

हन्ना असे म्हणते, तिचे वजन कमी झाल्याने तिला फार आनंद होत आहे. स्नायू बनण्यासाठी हन्ना वेट लॉस ट्रेनिंग घेतेय.. आठवड्यातून पाच दिवस ती  व्यायाम करते. दिवसभरात मर्यादित स्वरूपात ती खाद्यपदार्थांचे सेवन करते. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. तिच्या डाएटमध्ये फळे व भाज्यांचा प्रामुख्याने समावेश असतो.

आणखी वाचा: 

Weight Gain Tips: वजन वाढवण्यासाठी दररोज खा हे ड्रायफ्रुट्स

Health Care : तुम्हीही आंबट ढेकरांच्या समस्येमुळे आहात हैराण? जाणून घ्या रामबाण नैसर्गिक उपाय

झटपट वजन कमी करायचंय? मग आजच घरात लावा हे 7 औषधी वनस्पती

88
तज्ज्ञांचा सल्ला
Image Credit : Getty

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
आत्याचं स्पेशल गिफ्ट! 2 ते 5 हजारात भाचीसाठी खरेदी करा सर्वात सुंदर चांदीचे पैंजण!
Recommended image2
वधू होणार खुश! फक्त 10,000 मध्ये खरेदी करा हे 'युनिक' आणि भारी पैंजण डिझाईन्स!
Recommended image3
फक्त 2 ग्रॅम सोन्यात, 18Kt चे डिझायनर कानातले! नव्या डिझाइन्सची किंमत ऐकून व्हाल थक्क!
Recommended image4
लीप बामच्या वापरानं ओठांना येईल तजेलदारपणा, लावताना घ्या हि काळजी
Recommended image5
सासूला भेट द्या 2gm गोल्ड थ्रेडर इअरिंग, बघा निवडक आकर्षक डिझाइन्स!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved