शरीराचे वजन कमी करण्यासाठी नियमित डाएट व व्यायाम करणे आवश्यक आहे. पण याव्यतिरिक्त आपण औषधी वनस्पतींचा डाएटमध्ये समावेश करूनही वेटलॉस करू शकता.
Lifestyle Nov 25 2023
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
औषधी वनस्पतींचा फायदा
वजन कमी करण्यामध्ये आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा कसा फायदा होऊ शकतो, जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.
Image credits: Getty
Marathi
कोरफड
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोरफडीच्या गराचा आहारात समावेश केल्यास पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळू शकते. ज्यामुळे वजन कमी होऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
तुळस
तुळशीच्या रोपामध्ये औषधी गुणधर्मांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यामुळे तुळशीची पाने सकाळच्या वेळेस उपाशी पोटी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Image credits: Getty
Marathi
आर्टिचोक
आर्टिचोकमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आहे. आर्टिचोकची कोशिंबीर तयार करून आपण त्याचे सेवन करू शकता. ज्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
Image credits: Getty
Marathi
मेथी
मेथीच्या भाजीचा आहारात समावेश केल्यास लठ्ठपणाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. शिवाय त्वचा-केसांचे आरोग्यही सुधारते.
Image credits: Getty
Marathi
पुदिना
पुदिन्याच्या सेवनामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारण्यास मदत मिळते. यामुळे वजन झटपट कमी होऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
आवळा
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. या गुणधर्मांमुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. शिवाय आवळा केस-त्वचेसाठी देखील लाभदायक आहे.
Image credits: Getty
Marathi
पालक
पालकमध्ये लोह आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डाएटमध्ये या पालेभाजीचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.