वजन कमी करण्यासाठी हे 5 फूड कॉम्बिनेशन डाएटमध्ये नक्की ट्राय करा
- FB
- TW
- Linkdin
वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी खास फूड कॉम्बिनेशन
वजन वाढणे सध्याच्या काळात प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये आढळणारी समस्या झाली आहे. यामुले वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सराइज आणि डाएटची मदत घेतली जाते. पण तरीही काहीवेळेस वजन कमी होत नाही. यामागे काही कारणे असू शकतात. पण काही हेल्दी फूड कॉम्बिनेशनच्या मदतीने शरिरातील पचनक्रिया सुधारण्यासह वजनही कमी होऊ शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
डाळीसोबत हिरवी मिरची आणि लिंबू
डाएटमध्ये डाळीचा समावेश असावा असे सांगितले जाते. यामधून भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम आणि फायबर मिळतात. पण डाळीमध्ये हिरवी मिरची आणि लिंबाचा रस मिक्स केल्यास वजन कमी होण्यास फायदा होऊ शकतो. डाळीत लोह असते, जे लिंबूमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सी सोबत मिळून शरिरात काम करते. यामुळे शरिरातील मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते आणि वजनही कमी होते.
हळदीच्या पाण्यात काळी मिरी पावडर
हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हळदीच्या पाण्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते. याशिवाय हळदीचे पाणी शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. दुसऱ्या बाजूला काळी मिरी पावडर हळदीच्या पाण्यात टाकल्यास कॅलरीज बर्न होण्यासह वजन कमी करण्यास मदत होते.
एवोकाडो आणि हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरीज फार कमी प्रमाणात असतात. पण फायबर भरपूर प्रमाणात असते याशिवाय एवोकाडो फायबरचा उत्तम स्रोत आहे. यामुळे एवोकाडो आणि हिरव्या पानांच्या भाज्या खाल्ल्याने शरिराला भरपूर प्रमाणात पोषण तत्त्वे मिळतात. याशिवाय वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.
वरण-भात
वरण-भातामध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्त्वे असतात. वरणाचे दररोज सेवन केल्याने फायबर, लोह आणि फॉलेट शरिराला मिळते. याशिवाय भाताचे सेवन केल्याने शरिराला कार्ब्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात मिळतात. वरण-भाताचे कॉम्बिनेशन शरिरासाठी प्रोटीनचा उत्तम स्रोत मानले जाते. लक्षात असू द्या, डाएट करताना भाताचे प्रमाण मर्यादित असणे महत्वाचे आहे.
ग्रीन टी आणि लिंबू
ग्रीन टी मध्ये लिंबाचा रस मिक्स केल्यास शरिराला उत्तम प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स मिळतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ग्रीन टी आमि लिंबूच्या रसाचे सेवन केल्याने कॅलरीज बर्न होतात. याशिवाय हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी होण्यासह वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
मूग खाण्याचे 8 भन्नाट फायदे, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल
Apple Cider Vinegar मुळे आरोग्यच नव्हे त्वचाही चमकेल, जाणून घ्या फायदे