सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात वेळेची कमतरता असल्याने आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. पण हेल्दी राहण्यासाठी नाश्तामध्ये मूगसारख्या गोष्टींचे सेवन करू शकता.
मोड आलेल्या मूगामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यासह चयापचयाच्या क्रियाही मजबूत होते.
शरिरात ज्या व्यक्तींना रक्ताची कमतरता भासते त्यांनी मूगाचे सेवन करावे. यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. यामुळे रक्तातील ऑक्सिजनचा स्तर वाढला जातो.
मूगाचे सेवन केल्याने त्वचा हेल्दी राहण्यास मदत होते. मूगात असलेल्या काही पोषण तत्त्वांमुळे त्वचेला फायदा होतो.
मूगामध्ये व्हिटॅमिन ए असते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासही मदत होते.
डाएटमध्ये मूगाचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे वजन नियंत्रणात राहू शकते.
मूगामध्ये अँटीऑक्सिडेंट्स, क्लोरोफिल आणि व्हिटॅमिन सी सारखे गुणधर्ण असतात. यामुळे मोड आलेले मूग खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते.
मूगात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. यामुळे स्नायूंना बळकटी मिळण्यात मदत होते.