Marathi

पावसाळ्यात करटुल्याची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वजनही होईल कमी

Marathi

करटुल्याच्या भाजीचे फायदे

पावसाळ्यात उगवणाऱ्या करटुल्याच्या भाजीचे काही गुणकारी फायदे होतात. या भाजीमध्ये प्रोटीन, फायबरसारखे काही महत्वाचे पोषण तत्त्वे असतात. पाहूया करटुल्याच्या भाजीचे फायदे सविस्तर.

Image credits: Facebook
Marathi

वजन होईल कमी

करटुल्याच्या भाजीमध्ये फाइटोन्युट्रिएंट्स असतात. याशिवाय कॅलरीज कमी प्रमाणात असल्याने करटुल्याच्या भाजीचे दररोज सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

Image credits: Freepik
Marathi

त्वचेसाठी फायदेशीर

करटुल्यास बीटा कॅरेटीन, ल्युटेनसारखी पोषण तत्त्वे असतात, जी त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामधील अँटी-एजिंग गुणधर्मही त्वचा उत्तम ठेवण्यास मदत करतात.

Image credits: freepik
Marathi

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

भाजीतील पोषण तत्त्वांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय करटुल्यात फायबरचे प्रमाण अत्याधिक असल्याने मधुमेहाच्या रुग्णांनी ती भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो.

Image credits: Getty
Marathi

उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो

करटुल्याच्या भाजीत पोटॅशियमच भरपूर प्रमाणात असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

पचनक्रिया सुधारते

करटुल्यामध्ये फायबर अत्याधिक प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारली जाते. यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहता.

Image credits: Freepik
Marathi

इन्फेक्शनपासून दूर राहता

पावसाळ्यात करटुल्याच्या भाजीमुळे सर्दी, खोकला अथवा अ‍ॅलर्जीसारख्या समस्यांपासून बचाव होतो. यामध्ये अँटी-अ‍ॅलर्जीक गुणधर्म असतात.

Image credits: Getty
Marathi

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत मानल्या जाणाऱ्या करटुल्याच्या भाजीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Facebook

श्रावणात महादेवाच्या पूजेसाठी आप्पीसारखे रिक्रिएट करा हे 8 लूक

Sharavn Recipes : श्रावण स्पेशल वालाचे बिरडे, पाहा रेसिपी

श्रावणात मुंबईतील शंकरांच्या या 5 प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या

Deep Amavasya 2024 दिवशी करा हे उपाय, दूर होतील आयुष्यातील संकटे