बदलत्या वातावरणामुळे अनाचक वाढलेत हे 3 आजार, वेळीच घ्या आरोग्याची काळजी

| Published : Sep 24 2024, 09:32 AM IST / Updated: Sep 24 2024, 09:36 AM IST

fever
बदलत्या वातावरणामुळे अनाचक वाढलेत हे 3 आजार, वेळीच घ्या आरोग्याची काळजी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकलासह संसर्गजन्य तापासारखे काही आजार वाढू लागले आहेत. यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. बदलत्या वातावरणामुळे सध्या आजार वाढत चालले असून याची लक्षणे आणि उपाय काय याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

Health Care Tips : गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये सर्दी-खोकला, डोकेदुखी,अंगदुखी आणि ताप असे संसर्गजन्य आजार अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. खरंतर, बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम झाल्याने आजार मागे लागत आहेत. एखाद्याला सर्दी-खोकला झाल्यानंर आजूबाजूला असणाऱ्या निरोगी व्यक्तीलाही त्याची लागण होते. एवढेच नव्हे देशभरात विविध ठिकाणी डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. अशातच स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. जाणून घेऊया सर्दी-खोकला किंवा व्हायरल फीवर पासून कसा बचाव करायचा आणि लक्षणे काय याबद्दल सविस्तर....

काय म्हणतायत आरोग्य तज्ज्ञ
आरोग्य तज्ज्ञ असे म्हणतायत की, कडक ऊन पडल्यानंतर अचानक पाऊस पडतो किंवा स्थिती कधीकधी उलट होते. याचा आरोग्यावर प्रभाव पडला जातो. खरंतर, आपले शरिर वातावरणात झालेल्या अचानक बदलाला स्विकारण्यास पूर्णपणे तयार होत नाही. अशातच याचा थेट परिणाम व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीवर होतो. रोगप्रतिकारशक्ती मजबून नसल्याने संसर्गजन्य आजार लगेच होण्याची शक्यता वाढली जाते. संसर्गजन्य आजार दोन ते चार दिवसात बरे होतोत. पण बॅक्टेरियरल इन्फेक्शन झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

खोकला बरा होण्यासाठी लागतोय वेळ
बहुतांश नागरिकांमध्ये खोकला बरा होण्यासाठी वेळ लागत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, सर्दी किंवा ताप असे संसर्गजन्य आजार झाल्यानंतरही खोकला राहू शकतो. याला पोस्ट व्हायरल खोकला असे म्हटले जाते.

ही खास लक्षणे ओखळा
बहुतांश प्रकराणत सकाळच्या वेळेस कमी खोकला येतो. दुपारनंतर खोकला अधिक वाढला जातो. याशिवाय डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येणे, शरीर गरम होणे अशी लक्षणे दिसून येऊ लागतात. पोस्ट व्हायरल खोकला तीन ते आठ आठवडे राहू शकतो. दीर्घकाळानंतरही खोकला बरा होत नसल्यास डॉक्टरांची भेट घ्यावी.

मेडिकल स्टोरमधून औषध घेताना घ्या काळजी
सर्वसामान्यपणे ताप किंवा अंगदुखीच्या समस्येवक मेडिकल स्टोरमधून काहीजण औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतात. याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दिल्लीतील ड्रग कंट्रोल विभागाने सर्व मेडिकल स्टोर संचालकांना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री करू नये.

डॉक्टरांनी तपासल्याशिवाय औषधे घेऊ नका
आरोग्य तज्ज्ञांनुसार, एस्प्रिन, डायक्लोफेनेक आणि आयबूप्रोफेन या तीन श्रेणीतील औषधे नॉन-स्टेरॉइड अँटी-इंफ्लेमेंट्री ड्रग आहेत. या औषधांमुळे वेदना कमी होतात. एस्प्रिन औषध शरिरातील प्लेटलेट्स वेगाने कमी करते. यामुळे डेंग्यू झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधणे घेणे टाळा.

आणखी वाचा : 

डास आणि माश्या दूर होतील, घरीच बनवा हे 5 फ्लोअर क्लीनर

जमिनीवर बसून जेवण करण्याचे 4 भन्नाट फायदे, वजनही राहिल नियंत्रणात