सार

Vijayadashami 2024 : प्रत्येक दिवशी विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला शस्र पूजन केले जाते. या परंपरेच्या माध्यमातून शस्रांशिवाय कोणतेही युद्ध जिंकले जात नाही अशी शिकवण मिळते.

Shastra Puja 2024 Details : अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला म्हणजेच दसरा किंवा विजयादशमी साजरी केली जाते. यंदा दसरा 12 ऑक्टोबरला साजरा होणार आहे. या दिवशी काही परंपरा पाळल्या जातात. जसे की, रावण दहन, शमीची पूजा, आपट्याच्या पानाची पूजा आणि शस्र पूजा. यापैकी शस्र पूजनाची परंपरा वर्षानुवर्षे केली जात आहे. जाणून घेऊया दसऱ्यावेळी शस्र पूजन करण्याचा शुभ मुहूर्त, विधी सविस्तर...

शस्र पूजनाचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दशमी तिथीला यंदा दसरा साजरा होणार आहे. शनिवारी सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी दसऱ्याचा मुहूर्त सुरु होणार असून 13 ऑक्टोर, रविवारी सकाळी 09.09 मिनिटपर्यंत असणार आहे. या दिवशी शस्र पूजेसाठी शुभ मुहूर्त दुपारी 02 वाजून 03 मिनिटांपासून ते दुपारी 02 वाजून 49 मिनिटांपर्यंत असणार आहे. पाहा अन्य शुभ मुहूर्त

  • सकाळी 11.50 ते दुपारी 12.36 वाजेपर्यंत
  • दुपारी 12.13 ते दुपारी 01.39 मिनिटांपर्यंत
  • अमृत मुहूर्त दुपारी 03.06 वाजून ते संध्याकाळी 04.33 मिनिटांपर्यंत

अशी करा शस्र पूजा

  • दसऱ्याच्या सकाळी स्नान करुन शुभ मुहूर्तावेळी स्वच्छ ठिकाणी देवीचा फोटो लावा. देवीच्या फोटोसमोर घरातील हत्यारे व्यवस्थितीत ठेवा.
  • घरातील हत्यारांवर गंगाजल शिंपडून पवित्र करा. यानंतर लाल धागा बांधून हळद-कुंकू वाहून दिवा लावा.
  • देवीला मीठाईचा नैवेद्य दाखवा
  • शस्राची पूजा करताना पुढील मंत्र म्हणा-

आश्विनस्य सिते पक्षे दशम्यां तारकोदये। स कालो विजयो ज्ञेयः सर्वकार्यार्थसिद्धये॥

शस्र पूजन का केले जाते?
पुराणानुसार, प्राचीन काळात महिषासुर नावाचा एक दैत्य होता. त्याने देवतांचा पराभव केला होता. त्यावेळी त्रिदेव यांनी आपल्या शक्तिमधून एक शक्ती निर्माण केली. या शक्तिला देवी दुर्गेचे नाव दिले. देवतांनी देवीला आपली सर्व शस्रे-अस्रे देऊन शक्तिशाली बनवले. याच देवीने महिषासुराचा वध केला. ज्या दिवशी वध केला जेव्हा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी होती. यामुळेच अस्रांना महत्व देत विजयादशमीच्या दिवशी शस्र पूजनाची परंपरा पार पाडली जाते.

आणखी वाचा : 

16 की 17 ऑक्टोबर? यंदा कोजागिरी पौर्णिमा कधी, पाहा योग्य तारीख

दसऱ्यावेळी हातावर काढण्यासाठी 7 खास Mehndi Designs