कोजागिरी पौर्णिमा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी साजरी केली जाते. जाणून घेऊया योग्य तारीख...
पंचांगानुसार, यंदा अश्विन महिन्यातील पौर्णिमा 16 ऑक्टोबरला रात्री 8.40 वाजता सुरु होणार असून 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4.56 मिनिटांपर्यंत असणार आहे.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रवीण द्विवेदींनुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमेला 16 ऑक्टोबरला संपूर्ण रात्रभर असणार आहे. यामुळे कोजागिरी 16 तारखेला आहे.
मान्यतेनुसार, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होते. यामुळे रात्री दूध किंवा खीर चंद्राच्या छायेत ठेवली जाते.
कोजागिरीच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते असे मानले जाते. यावेळी कोण जागतेय हे पाहते. जो व्यक्ती कोजागिरीच्या रात्री जागा राहतो त्याच्या घरी लक्ष्मी थांबते असे मानले जाते.