MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Vastu Tips : वास्तुशास्रानुसार घरात ठेवा या 7 वस्तू, होईल आर्थिक भरभराट

Vastu Tips : वास्तुशास्रानुसार घरात ठेवा या 7 वस्तू, होईल आर्थिक भरभराट

आपल्या आयुष्यावर वास्तुशास्त्राचा खूप मोठा प्रभाव असतो. घरात सुख-समृद्धी नांदावी, पैशांची चणचण भासू नये असं प्रत्येकाला वाटतं. वास्तुशास्त्रानुसार काही खास वस्तू घरात ठेवल्यास पैशांची कधीच कमतरता भासत नाही.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 21 2026, 10:40 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
वास्तुशास्रानुसार काय करावे
Image Credit : Gemini

वास्तुशास्रानुसार काय करावे

प्रत्येकाला आपल्या घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास हवा असतो. पण अनेकदा खूप कष्ट करूनही पैसा टिकत नाही किंवा घरात सतत वाद होतात. वास्तुशास्त्रानुसार, काही खास पवित्र वस्तू योग्य दिशेने ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात ऐश्वर्य व सौभाग्य नांदतं. चला, या महत्त्वाच्या वस्तू आणि त्यांच्या योग्य दिशांबद्दल जाणून घेऊया.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
1. मनी प्लांट
Image Credit : chatgpt

1. मनी प्लांट

वास्तुशास्त्रात मनी प्लांटला खूप महत्त्व आहे. हे घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून सकारात्मक वातावरण निर्माण करतं. मनी प्लांट नेहमी घराच्या आग्नेय (South-East) दिशेला ठेवावं. या दिशेचा स्वामी गणपती आणि ग्रह शुक्र असल्यामुळे संपत्ती लवकर आकर्षित होते. या रोपाची पानं सुकणार नाहीत आणि वेली जमिनीला स्पर्श करणार नाहीत याची काळजी घ्या.

Related Articles

Related image1
Vastu Tips : पलंगाखाली चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू, घरात येईल गरिबी आणि आजारपण!
Related image2
Foreign Travel : 'या' राशींच्या नशिबात आहे परदेशवारीचा योग, तुमची रास आहे का?
38
2. शंख:
Image Credit : Getty

2. शंख:

समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीसोबत शंखाचीही उत्पत्ती झाली. त्यामुळे शंख लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. देवघरात शंख ठेवून त्याची पूजा केल्याने किंवा तो रोज फुंकल्याने घरातील नकारात्मक शक्ती आणि वास्तुदोष दूर होतात. देवघरात ईशान्य दिशेला तांदूळ किंवा पाण्यावर शंख ठेवणं शुभ मानलं जातं.

48
3. लाफिंग बुद्ध:
Image Credit : stockphoto

3. लाफिंग बुद्ध:

लाफिंग बुद्धा घराच्या मुख्य दरवाजासमोर, जमिनीपासून किमान 30 इंच उंचीवर ठेवावा. यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा रोखली जाते. याला थेट जमिनीवर, बेडरूममध्ये किंवा बाथरूमजवळ कधीही ठेवू नये.

58
4. मोरपिस
Image Credit : chatgpt

4. मोरपिस

4. मोरपिस: मोरपिसामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. हे घरातील राहू दोष आणि आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करतं. घरात आग्नेय किंवा दक्षिण-आग्नेय कोपऱ्यात मोरपिस ठेवल्यास धन आकर्षित होतं. देवघरात ठेवल्यासही चांगले परिणाम मिळतात.

68
5. क्रिस्टल पिरॅमिड:
Image Credit : Getty

5. क्रिस्टल पिरॅमिड:

स्फटिक किंवा क्रिस्टल आपल्या सभोवतालची ऊर्जा शुद्ध करून सकारात्मक ऊर्जा पसरवतात. कुटुंबातील सदस्यांमधील संबंध सुधारण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी क्रिस्टल पिरॅमिड खूप प्रभावी आहे. याला हॉलमध्ये ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवू शकता.

78
6. कुबेर यंत्र / लक्ष्मी यंत्र:
Image Credit : Asianet News

6. कुबेर यंत्र / लक्ष्मी यंत्र:

संपत्तीची देवता कुबेर यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे यंत्र घरात स्थापित करतात. उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते. त्यामुळे कुबेर यंत्र देवघरातील उत्तरेकडील भिंतीवर किंवा तिजोरीत ठेवल्यास पैशांचा ओघ सतत सुरू राहतो.

88
7. बांबू प्लांट
Image Credit : ChatGPT

7. बांबू प्लांट

पिवळ्या किंवा लाल धाग्याने बांधलेल्या दोन बांबूच्या बासरी मुख्य दरवाजावर लावल्यास घरात लक्ष्मीचं आगमन होतं. तसेच, घरात एक छोटं लकी बांबू (Lucky Bamboo) रोप लावल्याने घरात समृद्धी येते.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
मॉडर्न मुलींसाठी सोन्याच्या कानातल्यांचे एकदम हटके डिझाइन्स!
Recommended image2
Alcohol Mixing : अल्कोहोलमध्ये तुम्ही सोडा किंवा पाणी मिक्स करता का? वाचा एक्सपर्ट्स काय म्हणतात
Recommended image3
ड्रेसला हेव्ही लूक हवाय? ट्राय करा 'या' स्टायलिश नेक डिझाइन्स
Recommended image4
पैठणी किंवा सिल्क साडीत दिसाल रॉयल, ट्राय करा हे नेकलेस
Recommended image5
Banana Freshness : केळी घरी आणल्यानंतर लगेच पिकतात? कारण घ्या जाणून
Related Stories
Recommended image1
Vastu Tips : पलंगाखाली चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू, घरात येईल गरिबी आणि आजारपण!
Recommended image2
Foreign Travel : 'या' राशींच्या नशिबात आहे परदेशवारीचा योग, तुमची रास आहे का?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved