अयोध्येतील राम मंदिराशिवाय ही ठिकाणे आहेत प्रसिद्ध, नक्की भेट द्या
शरयू नदीच्या तटावर गुप्तार घाट आहे. या ठिकाणी भगवान रामांनी आपल्या वनवासादरम्यान येथे आंघोळ केल्याचे सांगितले जाते. अयोध्येतील हे एक पवित्र ठिकाण आहे.
स्वर्ग द्वाराला 'स्वर्गातील प्रवेश द्वार' देखील म्हटले जाते. हे द्वार स्वर्गाकडे जात असल्याची मान्यता आहे. भगवान राम यांच्या अयोध्येतील प्रस्थानाच्या कथेशी संबंधित हे द्वार आहे.
काली माता मंदिर हे देवी कालीला समर्पित असून अयोध्येतील हे एक महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे. राम मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर या मंदिरातील देवीचा आशीर्वादही नक्की घ्या.
भगवान राम आणि पत्नी सीता मातेला कनक भवन हे मंदिर समर्पित करण्यात आले आहे. अशी मान्यता आहे की, भागवान राम यांची सावत्र आई कैकयीकडून सीतेला लग्नानंतर कनक भवन दिले होते.
नारेश्वरनाथ मंदिर हे भगवान शंकरांना समर्पित आहे. अयोध्येतील सर्वाधिक जुन्या मंदिरांपैकी हे एक आहे. या मंदिराची स्थापना स्वत: भगवान रामांनी केल्याचे मानले जाते.
त्रेता के ठाकूर मंदिर हे भगवान रामाला समर्पित आहे. या ठिकाणी रामाने अश्वमेध यज्ञ केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर एक तीर्थक्षेत्र असून भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
हनुमान गढी हे भगवान रामा यांचा भक्त हनुमान याला समर्पित मंदिर आहे. हे मंदिर उंच टेकडीवर स्थित आहे. या मंदिरात वर्षभर भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणत गर्दी करतात.