थंडीतही आयस्क्रिमसारखे घरच्याघरी तयार करा दही, वाचा मास्टरशेफची खास टीप

| Published : Nov 29 2024, 04:52 PM IST

How-to-set-curd-in-winter
थंडीतही आयस्क्रिमसारखे घरच्याघरी तयार करा दही, वाचा मास्टरशेफची खास टीप
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

थंडीच्या दिवसात दह्याचे विरजण लावणे थोडे मुश्किलच असते. यासाठीची खास टीप मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी दिली आहे.

Home made dahi trick : दह्यामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे थंडी असो किंवा उन्हाळा यावेळी दह्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण थंडीच्या दिवसात दही तयार करणे थोडे मुश्किल होऊ शकते. कारण दह्याच्या विरजणाला पुरेशी उष्णता मिळत नाही. जाणून घेऊया मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी दही लावण्यासंदर्भात दिलेली खास टीप सविस्तर...

थंडीतही मिळेल आयस्क्रिमसारखे दही
इंस्टाग्रामवर मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये थंडीतही घट्ट दही घरच्याघरी कसे तयार करू शकता यासाठीची खास टीप दिली आहे. घट्ट दह्यासाठी स्टील किंवा सिरेमिकचे भांडे घेऊन त्यामध्ये कोमट दूध घ्या. यामध्ये एक चमचा दही घालून व्यवस्थितीत मिक्स करा. आता दही रुम टेंम्पचेरमध्ये ठेवण्याएवजी पीठाच्या डब्यामध्ये रात्रभर भांड्यासह ठेवा. सकाळी उठल्यानंतर डब्यामधील दह्याचे भांडे काढा.

View post on Instagram
 

दह्यासाठी अन्य ट्रिक
थंडीच्या दिवसात दही तयार करण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत. सर्वप्रथम दूध उकळवून कोमट करा. यानंतर दह्याचे विरजण लावण्यासाठी एखाद्या गरम ठिकाणी ठेवा. तुम्ही ओव्हन किंवा मायक्रोव्हेवमध्येही ठेवू शकता. अधिक थंडी असल्यास एका पातेल्यामध्ये पाणी गरम करा आणि त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा. थंडीच्या दिवसात दही तयार होण्यासाठी 8 ते 10 तासांचा कालावधी लागतो. लक्षात ठेवा दही तयार करण्यासाठी फुल क्रिम मलाईदार दूधाचा वापर करू शकता. यामुळे घट्ट दही तयार होऊ शकतो.

आणखी वाचा : 

आठवड्याभरात वजन कमी करण्यासाठी खा अळशी

थंडीत काचेसारखी चमकेल त्वचा, कोरफडचा असा करा वापर