सार
आयुर्वेदात तुळशीच्या रोपाची औषधी वनस्पतींमध्ये गणना केली जाते. यामुळे आरोग्यासंबंधित काही समस्या दूर होण्यास मदत होते. खासकरुन सर्दी-खोकल्यासारख्या समस्येवर तुळशीच्या चहाचे सेवन केले जाते. जाणून घेऊया तुळशीच्या चहाचे गुणकारी फायदे सविस्तर...
Tulsi Tea Benefits : सध्या थंडीचे दिवस सुरू झाले असून बदलत्या ऋतुमध्ये काही आजारही मागे लागतात. खासकरुन सर्दी-खोकल्याचा त्रास बहुतांशजणांना थंडीत उद्भवला जातो. अशातच तुळशीची चहा सर्दी-खोकल्याच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. जाणून घेऊया तुळशीच्या चहाचे सेवन केल्याने होणारे काही फायदे सविस्तर...
सर्दी-खोकल्यापासून आराम
तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तुळशीच्या चहाचे सेवन केल्याने थंडीत होणारा सर्दी-खोकल्याचा त्रास दूर होऊ शकतो.
डोकेदुखीपासून आराम
थंडीत डोकेदुखीची समस्या वाढली जाते. यावेळी तुळशीची चहा प्यायल्याने आरोग्यासाठी आणि डोकेदुखीच्या समस्येवर फायदेशीर ठरेल.
तणाव कमी होतो
तुळशीमधील काही गुणधर्म तणाव कमी करण्यास मदत करतात. यामध्ये असणाऱ्या यौगिक घटक मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर सेरोटोनिन आणि डोपामाइनला संतुलित करण्यास मदत करतात. याशिवाय तुळशीमधील अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म ब्लड प्रेशर आणि सूजेची समस्या कमी करू शकतो.
केसांसाठी फायदेशीर
तुळशीची चहा केसांसाठी देखील फायदेशीर आहे. केसांमध्ये थंडीत होणारा कोंडा, केस कोरडे होणे अशा समस्येवर तुळशीची चहा रामबाण उपाय आहे.
त्वचेसंबंधित समस्या होतील दूर
तुळशीच्या चहाचे सेवन केल्याने त्वचेवरील पिंपल्स-डागांची समस्या दूर होण्यास मदत होईल. यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडेंट्समुळे वृद्धत्वाची समस्याही दूर होते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
थंडीत मेकअप केल्यानंतर त्वचा कोरडी होते? Glow टिकवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स