सार

Diet for Working Women : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वत:साठी पुरेशा वेळ देता येत नाही. अशातच वजन वाढणे, लठ्ठपणा या समस्या उद्भवल्या जातात. खासकरुन वर्किंग महिलांचे डेली रुटीन नेहमीच बदलले जाते. 

Diet for Working Women : शरिरातील अत्याधिक फॅट्स वाढल्यास ते कमी करणे मुश्किलच होते. खासकरुन वर्किंग महिलांना वजन कमी करणे एक टास्क असते. एका बाजूला घराची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला ऑफिसच्या कामांचा ताण असल्याने वर्किंग महिलांना वजन कमी करण्यासाठी व्यायाम किंवा योगाभ्यास करण्यासाठी पुरेशा वेळ नसतो. अशातच तुम्ही देखील वर्किंग वुमन असून तुमचेही वजन वाढले असल्यास पुढील स्पेशल डाएट प्लॅन दररोज फॉलो करू शकता. जेणेकरुन 4-5 किलो वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

सकाळी उठल्यावर

  • सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी आणि 4 भिजवलेले बदाम खा.
  • एक ग्लास नारळ पाण्यामध्ये एक चमचा चिया सीड्सही मिक्स करु शकता.
  • 500 लीटर स्किम मिल्क पासून तयार करण्यात आलेली कोल्ड कॉफी

मिड मॉर्निंग

मिड मॉर्निंगवेळी एक कप ग्रीन टी प्या. यासोबत मखाना किंवा अन्य हेल्दी स्नॅक्सचे सेवन करू शकता.

दुपारचे जेवण

दुपारच्या जेवणामध्ये वर्किंग महिलांनी एक वाटी भातासोबत कमी तेलातील एखादी भाजी खा. अथवा भातावर वरणही घेऊ शकता.

संध्याकाळचा नाश्ता

संध्याकाळच्या नाश्तामध्ये ग्रीन टी सोबत 2 काकडीचे सॅलडचे सेवन करा.

रात्रीचे जेवण

वजन कमी करण्याच्या नादात बहुतांश महिला रात्रीचे जेवण करत नाही. मात्र, रात्रीचे जेवण करणे टाळणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. रात्री जेवणात पचनास हलकी असणारी एखादी भाजी, सूप किंवा सॅलडचे सेवन करू शकता. रात्रीच्या वेळेस भात किंवा चपातीचे सेवन करणे टाळा. चपातीमध्ये कार्ब्स असल्यने पचनासाठी थोडा वेळ लागतो.

रात्री जेवल्यानंतर...

रात्री जेवल्यानंतर एक कप ग्रीन टी सोबत एक वाटी पपईचे सेवन करू शकता.

View post on Instagram
 

आणखी वाचा : 

Intermittent Fasting करण्याआधी लक्षात ठेवा या 5 गोष्टी, अन्यथा...

थंडीत Hair Mask मुळे सर्दी-खोकला होतो? वापरा या वस्तू