सार
सध्या लग्नसोहळ्यासह थंडीचे दिवसही सुरू झाले आहेत. अशातच लग्नसोहळ्यात चारचौघांत उठून दिसण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. पण थंडीत मेकअप केल्यानंतर त्वचा कोरडी होत असल्याची समस्या बहुतांश महिलांना उद्भवली जाते.
Winter Makeup Tips : थंडीच्या दिवसात लग्नसोहळे मोठ्या प्रमाणात पार पाडले जातात. यावेळी महिला सौंदर्य खुलून दिसण्यासाठी मेकअप करतात. पण मेकअप केल्यानंतर सुंदर दिसण्याएवजी त्वचा कोरडी झाल्यासारखी वाटते. काहीवेळेस त्वचेवर मेकअप नीट सेट होत नाही. अशातच थंडीत मेकअप केल्यानंतर त्वचा कोरडी होत असल्यास पुढील काही स्टेप्स फॉलो करू शकता. जेणेकरुन मेकअपही व्यवस्थितीत होईल आणि लग्नसोहळ्यात तुमचा लूकही खुलला जाईल.
स्टेप 1 : चेहऱ्याला मसाज करा
थंडीच्या दिवसात मेकअप करण्यापूर्वी त्वचेवर मॉइश्चराइजर किंवा एखादे फेस ऑइल व्यवस्थितीत लावून मसाज करा. यामुळे ब्लड सर्कुलेशन उत्तम होईल आणि मेकअपही त्वचेवर नीट सेट होईल.
स्टेप 2 : मॉइश्चराइजर लावा
थंडीतच नव्हे तर उन्हाळ्यातही त्वचेला मॉइश्चराइजर लावणे फार महत्वाचे आहे. थंडीच्या दिवसात थंड वातावरणामुळे त्वचेमधील ओलसरपणा कमी होते. अशातच केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्यास त्वचेला नुकसान पोहोचले जाऊ शकते. यामुळे केमिकल फ्री ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करू शकता. जे खासकरुन कोरड्या त्वचेसाठी तयार केलेले असतात. मॉइश्चराइजर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि यानंतर फाउंडेशनचा वापर करा.
स्टेप 3 : फेस ऑइल ट्रिक
चेहऱ्यावर हेव्ही मेकअप करणार असल्यास केकी किंवा पॅची मेकअपची समस्या उद्भवू नये म्हणून फाउंडेशनमध्ये दोन-तीन थेंब फेस ऑइल मिक्स करा. यामुळे फाउंडेशन व्यवस्थितीत त्वचेवर सेट होईल.
स्टेप 4 : क्रिमी प्रोडक्ट्स निवडा
त्वचा कोरडी असल्यास मेकअप करताना फाउंडेशन किंवा हायलाइटरसारख्या प्रोडक्ट्सएवजी लिक्वीड किंवा क्रिमी प्रोडक्ट्स निवडा. थंडीच्या दिवसात सीसी क्रिम किंवा बीबी क्रिम बेस्ट पर्याय आहे.
स्टेप 5 : लिक्विड हायलाइटर
मेकअप पूर्ण झाल्यानंतर हायलाइटर नक्की लावा. यावेळी लिक्वीड हायलाइटर वापरू शकता. हे हायलाइटर नाक, भुवया आणि गालावर लावा. यामुळे चेहऱ्याचे कंटुरिंग होण्यासह मेकअपनंतर त्वचेवर ग्लो दीर्घकाळ टिकून राहतो.
स्टेप 6 : लिपस्टिकएवजी लिप ग्लॉस लावा
थंडीच्या दिवसात ओठ फाटण्याची समस्या उद्भवली जाते. अशातच मॅट लिपस्टिक लावू नका. थंडीत ग्लॉसी लिपस्टिक लावणे बेस्ट पर्याय आहे. यामुळे ओठांना ग्लो येतो. थंडीत मॅट किंवा फिनिश लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना त्याआधी ग्लॉस किंवा व्हॅसलिन नक्की लावा.
आणखी वाचा :
वर्किंग वुमनसाठी स्पेशल डाएट प्लॅन, 4-5 किलो वजन होईल कमी
2025 मध्ये मकर संक्रात 14 की 15 जानेवारी? जाणून घ्या योग्य तारखेसह शुभ मुहूर्त