सार
साध्य लग्नसराईची धूम सुरू आहे. कपडे आणि ज्वेल्लारी सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पोल्की ज्वेल्लारीचा ट्रेंड सुरु असल्याने जाणून घाई पोल्की ज्वेल्लारी नेमकी काय आहे. कुठून आणि कशी सातासमुद्रापार पोहोचली.
लग्न, शुभकार्याचा काळ आला, की वधूसाठी आणि स्वतःसाठीही काही खास आणि वेगळे दागिने बघताना पोल्की दागिने छान पर्याय आहे. भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा एक समृद्ध भाग असलेली पोल्की ज्वेलरी कांजीवरम, पैठणी, शालू बनारसी डिझायनर लेहंगा अशा वेगवेगळ्या आऊटफीटवर खूप छान दिसतात. सध्या पिंक कलर जोमात असल्यानं पिंक रॉयल पोल्की ज्वेलरी ट्रेडमध्ये आहे.
पोल्की ज्वेलरी म्हणजे भारतीय कला व संस्कृतीचा सुंदर मिलाफ, वर्षानुवर्षे या दागिन्यांनी भारतीय स्त्रियांच्या मनावर राज्य केले आहे. म्हणूनच तिला 'भारत की खोज' असेही संबोधले जाते. पोल्की हा हिन्ऱ्याचाच प्रकार, हा हिरा अनकट अर्थात पैलू न पाडलेला असतो. कोणतीच रासायनिक प्रक्रिया न करता पोल्की वापरला जातो. ही ज्वेलरी महागडी असल्याने ही 'रॉयल ज्वेलरी' म्हणून ओळखली जाते. भारतात पोल्कीचा वापर वर्षानुवर्षे होत होता; पण त्यांना खरी ओळख मिळाली ती मुघल काळामध्ये, या काळात या ज्वेलरीचा वापर मुघल स्विया जास्त करायच्या.
पोल्कीचे दागिने हे खूप आकर्षक आणि उठावदार असल्याने या ज्वेलरीने आपला चाहता वर्ग सांभाळून ठेवला आहे. पोल्की हे एक प्रकारचे हिरे आहेत. खाणीतून काढलेल्या हिऱ्याला वेगवेगळे आकार देण्याऐवजी त्यांचे स्लाइस म्हणजे चकत्या केल्या जातात. या स्लाइसना दागिन्यांमध्ये फिट केले जाते. हिन्यांच्या स्लाइसलाच 'पोल्की' म्हटले जाते. सोन्याच्या दागिन्यांमध्ये या स्लाइसला सेट करताना त्यामागे चांदीची एक लेयर टाकली जाते. त्याला 'डाक' म्हणतात. या डाकमुळे पोल्कीच्या स्लाइसला थ्री डायमेशनल लुक मिळतो आणि तो पूर्ण हिरा असल्याचा भास होतो. चांदीच्या लेयरमुळे पोल्की डायमंड अधिक चमकू लागतात. त्यामुळे ते खूप आकर्षक दिसतात. पोल्की दागिन्यांमध्ये पूर्ण हिरा वापरला जात नाही. हिन्ऱ्याच्या चकत्या वापरल्या जातात. त्यामुळे हे दागिने हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मानानं स्वस्त असतात. वेगळा लूक देण्यासाठी यामध्ये रुबी, सफायर, नीलम, पाचू आणि जेम स्टोनदेखील लावण्यात येतात. या स्टोन्समुळे पोल्की दागिन्यांना क्लासी लूक मिळतो.
ज्वेलरी सातासमुद्रापार:
हैदराबाद, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्येही पोल्की ज्वेलरी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे ही ज्वेलरी जिथे गेली, त्या भागाच्या आर्ट फॉर्मचा प्रभाव ज्वेलरीवर पाहायला मिळाला. हळूहळू पोल्कीला रुबीची जोड मिळाली व पोलकी 'ब्रायडल' ज्वेलरी म्हणून भारतीय नववधूंची आवडती झाली. कापडावर एम्ब्रॉयडरी होते त्याप्रमाणे पोल्की फिक्स केली जातात. रुबीच्या लाल रंगामुळे पोल्की ज्वेलरी सातासमुद्रापार पोचली. भारतच नव्हे तर अमेरिका, इंग्लंड, चीन, जपानमध्येही पोल्की प्रसिद्ध आहे. बरेचदा पोल्की व कुंदन हे सारखेच वाटतात; पण तसे नाही. पोल्की आणि कुंदनमध्ये बराच फरक आहे. असे म्हणतात की, पोल्कीचे दागिने कधीच जुने होत नाही. त्यांच्या नैसर्गिक चमक आणि सौंदर्यामुळे त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
आणखी वाचा :
Healthy Tips : उष्मघात आणि झळांपासून अशी घ्या स्वतःची काळजी
आंध्र प्रदेशात अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते होळी, पुरुष महिलांप्रमाणे साज करत साजरा करतात सण