Healthy Tips : उष्मघात आणि झळांपासून अशी घ्या स्वतःची काळजी

| Published : Mar 27 2024, 12:18 PM IST / Updated: Mar 27 2024, 02:39 PM IST

Summer Weather

सार

मे महिन्यामध्ये सर्वत्र तापमान वाढू लागले व घामाघूम व्हायला झाले की, सर्वांना उन्हाळ्याची झळ लागते. तर उन्हाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यायची ते बघूया.

 

उन्हाळा म्हणजे अंगाची काहिली होणे, रखरखीत उन्हाचा त्रास आणि घामाच्या धारा यामुळे अनेकांना उन्हाळा नकोस वाटतो. पावसाळा सुरु होईपर्यंत उन्हाचे चटके जाणवतात. यंदा पाऊस कमी पडल्याने फेब्रुवारीपासूनच उन्हाळा जाणवत आहे. मे पर्यंत अत्यंत वाईट परिस्थिती होणार असून यासाठी स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

उष्माघात:

उष्माघात ही जास्त तापमानामुळे झालेली एक तीव्र समस्या असते. यामध्ये शरीरात जास्त उष्णता शोषून घेतली जाते. यामुळे रक्तदाब कमी होतो व मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. हा गंभीर आजार असून त्यास त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज असते.बाहेर फिरताना डोक्याला कॉटनच्या कपड्याने बंधने किंवा इतर कोणताही कापड डोक्याला बांधणे आवशयक आहे. जेणे करून त्रीव्र उन्हाचा त्रास होणार नाही.

त्वचेवर होणारे परिणाम :

घामामुळे धामोळ्यांचा त्रास होतो. तर उष्णता जास्त असणाऱ्यांना त्वचेवर फोड येतात. या काळात त्वचेचा शुष्कपणा, वाढलेले घामाचे प्रमाण व धूळ यामुळे हे फोड येऊ लागतात. घामोळ्यांचा त्रास टाळण्यासाठी थंड पाण्यानेच अंघोळ करावी.पातळ व सैलसर कपडे घालावेत ज्यामुळे घाम कमी येईल आणि घामोळ्यांचा त्रास होणार नाही. अंघोळीनंतर शरीराला टाल्कम पावडर लावावी.तसेच कुठे पुरळ असल्यास त्यावर त्वरित उपाय करावा. उन्हाळ्यात आपल्या पायांना, मुख्यत्वे अंगठा व बोटे यांना त्वचेच्या रुक्षतेमुळे व धुळीमुळे जंतूसंसर्ग होऊ शकतो. बाहेरून आल्यानंतर पाय चांगले चोळून धुवावेत व आवश्यक असल्यास त्वचा मुलायम ठेवणारे बॉडी लोशनचा वापर करावा

हे केल्यास उन्हाचा परिणाम होणार कमी :

या काळात आहारात संत्री, मोसंबी सारख्या रसदार फळांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या, गाजर, शेंगदाणे व तृणधान्ये यांचा समावेश असावा म्हणजे त्वचा तुकतुकीत राहते. तसेच अनेकांना फिरस्तीचे काम असल्याचं मीठ साखर पाण्याचे सेवन करावे अथवा लिंबू शरबत देखील घेऊ शकता. जेणे करून थकवा, हातपाय गाळाने असे प्रकार टाळता येतील. उन्हाळ्यातील प्रचंड उष्णतेमुळे व निथळणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी सतत बाहेर जात असते. त्यामुळे अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर, मळमळ, पायात पेटके येणे सहज शक्य आहे. अश्यावेळी भरपूर पाणी, सरबत किंवा नारळपाणी प्यावे.

उन्हाळ्यातील आहार विहार:

उन्हाळयात घश्याला कोरड पडली म्हणून अत्यंत थंड पाणी पिऊ नये. शरीराच्या तपमानात साजेल असेच पाणी प्यावे. शरीराचे वाढणारे तापमान बाह्य तसेच अंतर्गत अवयवांना नुकसान पोहोचवू शकते. तसेच आत्यंतिक श्रम व व्यायाम टाळावा. उन्हाळ्याची तीव्रता कमी करण्यासाठी आहारात थोडा बदल करणे गरजेचे आहे. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात अन्न पचावयास जड असते म्हणून उन्हाळ्यात भुकेपेक्षा एक घास कमीच घ्यावा. आहारात भात, रताळी, गाजर, बीट, सुरण तसेच भेंडी, फ्लॉवर, पडवळ दोडकी या सारखे मधुर रस असलेले अन्नपदार्थ असावेत. दही, ताक व लस्सी या उन्हाळ्यात लाभकारक ठरतात. आंबट पदार्थ जसे की कैरी, पन्हे, कोकम सरबत, हे उष्णता कमी करतात व शरीर शीतल ठेवतात.

आणखी वाचा :

लहान मुलांच्या पोटात जंत का होतात? यावर उपाय काय आणि लक्षणे कसाही ओळखायची

Brown Sugar VS White Sugar: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसर कोणती शुगर आरोग्याला अधिक फायदेशीर?

खजूर खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

 Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.