सार
वाढत्या वयासह आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. यासाठी डाएट आणि डेली रुटीनच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. वाढत्या वयात खासकरुन वयाच्या चाळीशीत शरिरातील हाडांच्या बळकटीसाठी तीळाचे लाडू खाण्याचे फायदे जाणून घेऊया…
Til Laddu Benefits : वयाच्या चाळीशीत बहुतांश महिलांना हाड आणि सांधेदुखीच्या समस्येचा सामना करावा लागतो. गुडघ्यांमधून मोडल्याचा आवाज येणे, वेळोवेळी पाठ दुखणे अथवा अन्य आजार मागे लागतात. खरंतर, वयाच्या चाळीशीत आरोग्य बिघडण्यामागे काही कारणे असू शकतात. यासाठी डाएटमध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा. सध्या थंडीचे दिवस सुरू झाल्याने तिळाचे सेवन केले. यापासून तयार करण्यात आलेले लाडू किंवा अन्य पदार्थांचे सेवन केल्याने त्याचे फायदे काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया....
महिलांचे आरोग्य
भारतात किंवा जगभरातील अन्य देशांमधील महिलांचे लग्नानंतर वजन वाढले जाते. यामागील मोठे कारण म्हणजे लाइफस्टाइल पूर्णपणे बदलणे आहे. वाढत्या वयासह शरिरातील हाडं आणि अन्य भागात दुखणे सुरू होते. मुलं झाल्यानंतर आणखी काही बदल महिलांमध्ये होतात. फार कमी महिलांना अशा सर्व स्थितीत स्वत:ला फिट ठेवता येते. जबाबदाऱ्यांमुळे काही महिलांना स्वत:साठी पुरेसा वेळ देता येत नाही. अभावी वजन वाढणे किंवा आरोग्यासंबंधित अन्य समेस्याचा सामना करावा लागतो.
तिळातील पौष्टिक मूल्य
तिळामध्ये खूप पोषण तत्त्वे असतात. 100 ग्रॅम तिळामध्ये 573 कॅलरीज, सोडियम 11 ग्रॅम, पोटॅशियम 468 एमजी, कार्ब्स 23 ग्रॅम, डाएटरी फायबर 12 ग्रॅम, प्रोटीन 18 ग्रॅम, लोह 81 टक्के, व्हिटॅमिन बी6 40 टक्के, मॅग्नेशियम 87 टक्के आणि कॅल्शियम 97 टक्के असते.
तीळाचे लाडू खा
थंडीच्या दिवसात तिळाचे लाडू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या लाडूंमध्ये तीळासोबत गुळ, ड्राय फ्रुट्स आणि शुद्ध तूपाचा वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम गुळाचा पाक तयार करुन त्यामध्ये भाजलेले तीळ, ड्राय फ्रुट्स आणि तूप मिक्स करा. मिश्रण थोड थंड झाल्यानंतर लाडू तयार करा.
तीळाच्या लाडूचे आरोग्यदायी फायदे
- तिळाच्या लाडूचे सेवन केल्याने शरिराला फायबर भरपूर प्रमाणात मिळते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहू शकता. ज्या व्यक्तींना पोटासंबंधित समस्या आहेत त्यांनी तिळाच्या लाडूचे मर्यादेत सेवन करावे.
- उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तीळाचे सेवन करणे टाळावे. कारण तीळात पोटॅशियमचे प्रमाण अत्याधिक असते. तीळाचे लाडू खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- वजन वाढण्यासाठी तीळाच्या लाडूचे सेवन करावे. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असल्याने जंक फूड्स पासून दूर राहता.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
हिवाळ्यात गुळाचा चहा प्याल तर त्वचेवर येईल ग्लो, डाग देखील जातील निघून