तज्ज्ञांच्या मते.. केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी तांदळाचं पाणी खूप चांगलं असतं. यामध्ये अमीनो ॲसिड्स आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.
अनेक अभ्यासांनुसार, तांदळाच्या पाण्यात इनोसिटॉल नावाचा घटक असतो जो खराब झालेले केस दुरुस्त करतो.
तांदळाच्या पाण्याने नियमित केस धुतल्याने केस गळणं कमी होतं आणि कोंड्याची समस्या दूर होते.
तांदळाच्या पाण्यात कांद्याचा रस मिसळून डोक्याला लावून मसाज केल्याने केस गळणं थांबतं.
तांदळाच्या पाण्यात थोडी संत्र्याच्या सालीची पावडर मिसळून केसांना लावा आणि 20 मिनिटांनी धुऊन टाका. असं नियमित केल्यास चांगले परिणाम मिळतील.
ग्रीन टीमध्ये थोडं तांदळाचं पाणी मिसळून डोक्याला लावून मसाज करा. यामुळे खराब आणि कोरडे झालेले केस मऊ होण्यास मदत होते.
Saree Designs : तुमचं सौंदर्य खुलवणारे साडीचे हे ट्रेंडी डिझाईन्स नक्की पाहा
Blouse Designs : साडीवर सुंदर दिसण्यासाठी या ब्लाउज बॅक नेक डिझाईन्स पाहा
Hot Water Side Effects : वजन कमी करण्यासाठी दिवसभर गरम पाणी पिताय? सावधान!
Gold Purity : सोन्याची शुद्धता अशी ओखळा, अन्यथा होईल फसवणूक