Technology Tips: जुना स्मार्टफोन विकताय? ‘या’ गोष्टी करण्यास विसरू नका, अन्यथा...

| Published : Dec 07 2023, 10:30 AM IST / Updated: Dec 07 2023, 11:14 AM IST

Smartphone Sell

सार

Old Smartphone Selling : जुना स्मार्टफोन देऊन नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? तर थांबा. कारण जुना स्मार्टफोन विक्री करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुमचेच आर्थिक आणि खासगी नुकसान होऊ शकते.

Safety tips for smartphone: मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन लाँच होत राहतात. अशातच बहुतांशजण जुना स्मार्टफोन देऊन नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करतात. पण जुना स्मार्टफोन विक्री करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. याशिवाय जुन्या स्मार्टफोनमधील खासगी डेटा देखील लीक होऊ शकतो. यामुळे पुढील काही लक्षात ठेवल्या पाहिजेत.जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...

बँकिंग अ‍ॅप डिलीट करा
जुना स्मार्टफोन विक्री करण्यापूर्वी सर्वप्रथम फोनमधील सर्व बँकिंग अ‍ॅप डिलीट करा. खरंतर स्मार्टफोनमधील बँकिंग अ‍ॅप मोबाईल क्रमांकाला आपण लिंक करतो.अशातच जुना स्मार्टफोन विक्री करण्यापूर्वी बँकेसंदर्भातील कोणतीही संवेदनशील माहिती लीक होऊ नये म्हणून स्मार्टफोनमधील बँकिंग अ‍ॅप डिलिट करा. यामुळे भविष्यात होणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून दूर राहाल.

कॉल आणि मेसेज हटवा
जुना स्मार्टफोन विक्री करणार असल्यास त्यामधील कॉल आणि मेसेज हटवा. कारण महत्त्वाचे मेसेज आणि कॉलचा डेटा लीक झाल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. त्याचसोबत फोनमधील कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेज संपूर्ण डिलिट झालेत की नाही याची देखील खात्री करून घ्या.

फोटो-व्हिडीओ बॅकअप
जुन्या स्मार्टफोनमधील गुगल फोटोज-व्हिडीओ, गूगल ड्राइव्ह, माइक्रोसॉफ्ट वन ड्राइव्ह, ड्रॉप बॉक्स अथवा एखाद्या क्लाउड सर्व्हिसच्या (Cloud Service) मदतीने मल्टीमीडिया फाइल्सचा बॅकअप घ्या. जेणेकरून डेटा तुमच्याकडे सुरक्षित राहील आणि जुन्या स्मार्टफोनमधून तो डिलिटही करता येईल.

सर्व अ‍ॅप आणि सोशल मीडिया अकाउंट
नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी जुन्या फोनमधील लॉगइन केलेले सर्व अ‍ॅप आणि सर्व अकाउंट लॉगआउट करा. सोशल मीडिया अकाउंट, बँकिंग अकाउंट लॉगइन नाहीत ना हे देखील पाहा. याशिवाय सोशल मीडिया, बँकिंग अकाउंटचे पासवर्ड देखील रिसेट करा.

व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप घ्या
जुन्या फोनला रिसेट आणि विक्रीपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप घ्या. अन्यथा तुमचे सर्व चॅट्स, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक नव्या स्मार्टफोनमध्ये मिळवणे कठीण होईल. व्हॉट्सअ‍ॅप ब‌ॅकअप असल्यास जुन्या स्मार्टफोनमधील सर्व चॅट्स, क्रमांक नव्या स्मार्टफोनमध्ये मिळतील.

आणखी वाचा:

Old Towel Reuse: जुन्या टॉवेलपासून अशी तयार करा स्टायलिश बॅग

Kitchen Tips: मेथीची भाजी निवडताना कंटाळा येतो? वापरा ही सोपी ट्रिक

Relationship Tips: पार्टनरसोबत पैशांवरून वाद होतात का? या टिप्स येतील कामी