सार

Summer Makeup Tips : उन्हाळ्याच्या दिवासात मेकअप दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण काही ट्रिक्स आणि टिप्सही वापरू शकता.

Summer Makeup Tips : उन्हाळ्याच्या दिवासातील कडक ऊन आण घामाच्या कारणास्तव त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्या जातात. याशिवाय मेअकप दीर्घकाळ कसा टिकवून ठेवायचा असा प्रश्न बहुतांश महिलांना असतो. उन्हाळ्यात मेकअप केल्यानंतर ऊन्हामधून घराबेर पडल्यास तो निघून जाण्यास सुरुवात होते. यामुळे चेहऱ्यावरील त्वचेवर पॅचेस दिसून लूक बिघडला जातो. अशातच उन्हाळ्यात मेकअप दीर्घकाळ कसा टिकवून ठेवायचा हे जाणून घेऊया.

त्वचेला मॉइश्चराइज करा

थंडी किंवा उन्हाळ्याचे दिवस असतो, मेकअप करण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चराइज करणे फार महत्वाचे आहे. काहीजण उन्हाळ्यात मॉइश्चराइजर न लावताच मेकअर करण्यास सुरुवात करतात. यामुळे लवकर घाम येण्यासह मेअकप निघून जातो.

प्राइमरचा वापर

उन्हाळ्यात मेकअप दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी उत्तम क्वालिटीच्या प्राइमरचा वापर करा. यामुळे त्वचेमधील अत्याधिक तेल नियंत्रित राहते आणि मेकअपचा लूक बिघडला जात नाही.

ऑइल फ्री फाउंडेशनची निवड

उन्हाळ्यात फाउंडेशन निघून जाण्याची भीती असते. अशातच लाइट वेट आणि ऑइल फ्री फाउंडेशनचा वापर करा.याशिवाय अत्याधिक लेअर देखील लावू नका.

वॉटरप्रुफ आय मेकअप

उन्हाळ्यात वॉटरप्रुफ मेकअप करावा. यावेळी डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वॉटरप्रुफ आयलाइनर आणि मस्काराचा वापर करू शकता.

फेस पावडरचा वापर

उन्हाळ्याच्या दिवसात मेकअप दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी फेस पावडरचा वापर करा. अशातच घामामुळे मेकअप लवकर निघून जाणार नाही.

मॅट लिपस्टिकचा वापर

लिपस्टिकशिवाय मेकअपचा लूक पूर्ण होत नाही. उन्हाळ्यात लिक्विट लिपस्टिकएवजी मॅट लिपस्टिक किंवा टिंटेड लिप बामचा वापर करू शकता. लिक्विड लिपस्टिक लवकर निघून जाऊ शकते.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)