सार
त्वचेच्या नॅच्युरल ग्लो साठी बहुतांशजण गुलाब पाण्याचा वापर करतात. पण तुम्हाला माहितेय का, सतत चेहऱ्यावर गुलाब पाणी वापरल्यास त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. याबद्दलच आज सविस्तर जाणून घेऊया.
Rose Water Disadvantages : गुलाब पाणी एक नॅच्युरल टोनरप्रमाणे वापरले जाते. हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक गुणांमुळे त्वचा फ्रेश आणि ओलसर राहण्यास मदत होते. गुलाब पाण्यामुळे त्वचेला येणारी सूज, पिंपल्स याची समस्या ही दूर होऊ शकतो. मात्र अत्याधिक प्रमाणात चेहऱ्याच्या त्वचेसाठी गुलाब पाण्याचा वापर केल्यास त्वचेला नुकसान पोहोचू शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ.
त्वचा कोरडी होणे
गुलाब पाण्यामध्ये हलके ऐस्ट्रिंजेंट गुण असतात, जे त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी करू शकतात. पण हेच गुण त्वचेमधील अतिरिक्त घाण आणि तेल काढण्यास मदत करतात. पण गुलाब पाण्याचा अत्याधिक वापर केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. कोरड्या त्वचेमुळे खाज येणे किंवा जळजळ होणे अशी समस्या उद्भवू शकते.
अॅलर्जी
गुलाब पाणी नॅच्युरल टोनर असले तरीही याचा सतत चेहऱ्यासाठी वापर करणे नुकसानदायक ठरू शकते. यामुळे अॅलर्जी होण्याची शक्यता वाढली जाते. जसे की, त्वचेवर लाल चट्टे येणेष खाज किंवा जळजळ होऊ शकते. गुलाब पाण्याचा पहिल्यांदाच वापर करत असाल तर त्वचेवरील लहान भागावर पॅच टेस्ट करुन पहा.
त्वचेचा pH स्तर बिघडला जातो
अत्याधिक प्रमाणात गुलाब पाण्याचा वापर केल्याने त्वचेचा pH स्तर बिघडला जातो. यामुळे त्वचेवर खाज, जळजळ किंवा रॅशेज येऊ शकतात.
असा करा वापर
गुलाब पाणी सकाळी आणि रात्रीच्या वेळेस कॉटन बॉल्सवर काढून चेहऱ्याला लावू शकता. याशिवाय एलोवेरा जेलमध्ये मिक्स करुनही त्वचेला लावू शकता.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)