MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Tawa Paneer Pulao : स्ट्रीट स्टाईल तवा पनीर पुलाव... घरीच असा बनवून पाहा!

Tawa Paneer Pulao : स्ट्रीट स्टाईल तवा पनीर पुलाव... घरीच असा बनवून पाहा!

Tawa Paneer Pulao : स्ट्रीट स्टाईल तवा पनीर पुलाव आपण आता घरीच सहज बनवू शकतो. बासमती तांदूळ, पनीर, भाज्या आणि पावभाजी मसाला वापरून हा चमचमीत पुलाव कसा बनवायचा? याची संपूर्ण कृती इथे पाहा.

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Nov 14 2026, 11:30 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
112
स्ट्रीट स्टाईल तवा पनीर पुलाव
Image Credit : Gemini Ai

स्ट्रीट स्टाईल तवा पनीर पुलाव

हॉटेलसारखी पुलावची चव घरी आणता येईल का, असा विचार करताय? तव्यावर वितळलेलं बटर, मसाल्यांचा सुगंध, रंगीबेरंगी भाज्या आणि मऊ पनीरचे तुकडे... हे वाचूनच तोंडाला पाणी सुटलं ना! एक घास खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटेल अशी याची चव असते.

रस्त्यावर मिळणाऱ्या तवा पुलावची खरी चव त्यात घातलेल्या पावभाजी मसाला आणि लसूण-मिरचीच्या पेस्टमुळे येते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा तवा पनीर पुलाव घरी बनवणं खूप सोपं आहे. वीकेंडच्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा नक्की ट्राय करा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
212
लागणारे साहित्य
Image Credit : Gemini Ai

लागणारे साहित्य

  • बासमती तांदूळ - १ कप
  • पनीर - २०० ग्रॅम
  • मोठे कांदे - २
  • टोमॅटो - २
  • गाजर - १
  • शिमला मिरची - १
  • हिरवे वाटाणे - १/४ कप
  • हिरवी मिरची - २
  • सुकी लाल मिरची - ४
  • लसूण - ६ पाकळ्या
  • जिरे - १ चमचा
  • लाल तिखट - १/२ चमचा
  • धणे पावडर - १ चमचा
  • पावभाजी मसाला - १ १/२ चमचा
  • हळद - १/४ चमचा
  • गरम मसाला - १/२ चमचा
  • बटर - २ मोठे चमचे
  • तेल - २ मोठे चमचे
  • मीठ - चवीनुसार
  • कोथिंबीर - थोडीशी

Related Articles

Related image1
Egg Curry Recipe : ट्राय करा ही खास रोस्टेड मसाला अंडा करी, वाचा रेसिपी
Related image2
Chicken Pickle Recipe : आंध्र स्टाईल चिकन लोणचं, महिनाभर टिकेल
312
कृती - पहिली पायरी
Image Credit : Gemini Ai

कृती - पहिली पायरी

भाज्या आणि पनीर तयार करणे

सर्वांत आधी पनीरचे लहान चौकोनी तुकडे करून घ्या. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरा. गाजर आणि शिमला मिरचीचे लांब आणि पातळ काप करा.

हिरवे वाटाणे आधीच भिजत ठेवून गरजेनुसार शिजवून बाजूला ठेवा.

412
दुसरी पायरी
Image Credit : Gemini Ai

दुसरी पायरी

लसूण-मिरचीची पेस्ट बनवणे

सुक्या लाल मिरच्या थोडा वेळ गरम पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर भिजवलेल्या मिरच्या, हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये एकत्र वाटून त्याची फाईन पेस्ट बनवा.

हीच लसूण-मिरचीची पेस्ट तुमच्या पुलावला झणझणीत आणि खास चव देईल.

512
तिसरी पायरी
Image Credit : Gemini Ai

तिसरी पायरी

बासमती तांदूळ शिजवणे

बासमती तांदूळ स्वच्छ धुवून २० ते ३० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर पाणी काढून टाका आणि उकळत्या पाण्यात थोडे मीठ व हळद घालून तांदूळ शिजवून घ्या.

भात पाऊण किंवा पूर्ण शिजल्यावर पाणी काढून तो बाजूला ठेवा. भात चिकट न होता मोकळा झाला पाहिजे.

612
चौथी पायरी
Image Credit : Gemini Ai

चौथी पायरी

तव्यावर फोडणी देणे

आता गॅसवर एक मोठा तवा ठेवा आणि त्यात बटर व तेल घाला. बटर वितळल्यावर त्यात जिऱ्याची फोडणी द्या.

त्यात चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि गाजर घालून परतून घ्या. भाज्या पूर्णपणे न शिजवता थोड्या क्रंची राहतील अशाच परता.

712
पाचवी पायरी
Image Credit : Gemini Ai

पाचवी पायरी

टोमॅटो आणि वाटाणे घालणे

कांदा आणि भाज्या थोड्या परतल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो आणि शिजवलेले हिरवे वाटाणे घाला. टोमॅटो मऊ होऊन भाज्यांमध्ये एकजीव होईपर्यंत परता.

812
सहावी पायरी
Image Credit : Gemini Ai

सहावी पायरी

मसाले घालणे

आता यात लाल तिखट, धणे पावडर, पावभाजी मसाला, हळद आणि गरम मसाला घाला.

त्यातच तयार केलेली लसूण-मिरचीची पेस्ट घालून चांगले मिक्स करा. मसाल्यांचा कच्चा वास जाईपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्या.

त्यानंतर चवीनुसार मीठ घाला, मसाले एकजीव होण्यासाठी थोडे पाणी शिंपडा आणि चांगले ढवळा.

912
सातवी पायरी
Image Credit : Gemini Ai

सातवी पायरी

पनीर घालणे

आता चौकोनी कापलेले पनीरचे तुकडे घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. मसाला पनीरच्या सर्व बाजूंना लागला पाहिजे. पनीर तुटणार नाही याची काळजी घ्या.

1012
आठवी पायरी
Image Credit : Gemini Ai

आठवी पायरी

भात घालून मिक्स करणे

शेवटी शिजवून निथळलेला बासमती भात तव्यावर घाला. सोबतच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. भाताची शीतं न मोडता सर्व जिन्नस हलक्या हाताने एकत्र करा. मसाला संपूर्ण भाताला छान लागला पाहिजे.

गरज वाटल्यास थोडे बटर घाला आणि गॅस बंद करा. हॉटेलसारख्या चवीचा आणि सुगंधाचा गरमागरम स्ट्रीट स्टाईल तवा पनीर पुलाव तयार आहे.

1112
तवा पनीर पुलाव चविष्ट होण्यासाठी काही टिप्स
Image Credit : Gemini Ai

तवा पनीर पुलाव चविष्ट होण्यासाठी काही टिप्स

  • बासमती तांदूळ जास्त शिजवू नका. भात मोकळा असेल तरच पुलाव छान दिसेल.
  • पनीर मसाल्यात जास्त वेळ परतू नका, नाहीतर ते कडक होईल.
  • स्ट्रीट स्टाईल चवीसाठी यात पावभाजी मसाला घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • बटर आणि तेल एकत्र वापरल्याने सुगंध आणि चव दोन्ही छान येते.
  • शिमला मिरची, गाजर यांसारख्या भाज्या जास्त न शिजवता थोड्या क्रंची ठेवा.
  • तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुक्या आणि हिरव्या मिरचीचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
1212
कशासोबत खावे?
Image Credit : Gemini Ai

कशासोबत खावे?

हा तवा पनीर पुलाव कांद्याच्या रायत्यासोबत, काकडीच्या कोशिंबिरीसोबत, चिप्स किंवा पापडासोबत खायला अप्रतिम लागतो. वरून थोडे बटर आणि कोथिंबीर भुरभुरून गरमागरम सर्व्ह करा.

घरीच स्ट्रीट फूडचा आनंद घेण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.

टीप : हा स्ट्रीट स्टाईल तवा पनीर पुलाव शेफ दिनू (Recipe By Chef Dinu) यांच्या रेसिपीवर आधारित आहे, याची नोंद घ्यावी.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Children's Day 2026 : बालदिनानिमित्त १०० पेक्षा जास्त शुभेच्छा, मेसेज आणि कॅप्शन्स!
Recommended image2
Horoscope 14th November 2026 : आज ऑफिसमध्ये मिळू शकते गुड न्यूज! जाणून घ्या तुमचं राशीभविष्य
Recommended image3
Sadhguru On Relationship: लग्न की लिव्ह-इन, कशात जास्त सुख? सद्गुरूंनी सांगितला नात्याचा खरा मंत्र
Recommended image4
Sleep Tips : मध्यरात्री अचानक झोप का मोडते? या 3 चुका कधीच करू नका
Recommended image5
Tea Brewing Mistakes: तुमचा चहा कडू का लागतो? या 5 चुका टाळा
Related Stories
Recommended image1
Egg Curry Recipe : ट्राय करा ही खास रोस्टेड मसाला अंडा करी, वाचा रेसिपी
Recommended image2
Chicken Pickle Recipe : आंध्र स्टाईल चिकन लोणचं, महिनाभर टिकेल
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved