MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Money Saving Tips : दर महिन्याला वाचवा 5000 रुपये, गृहिणींसाठी खास शॉपिंग टिप्स

Money Saving Tips : दर महिन्याला वाचवा 5000 रुपये, गृहिणींसाठी खास शॉपिंग टिप्स

शॉपिंगचा खर्च कमी करून दर महिन्याला ५,००० रुपयांपर्यंत बचत कशी करायची? ऑफर्स, ऑनलाइन शॉपिंग आणि किराणा सामानावरील खर्च वाचवण्याच्या सोप्या टिप्स.

4 Min read
Author : Karishma R
Published : Oct 01 2026, 09:06 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
गृहिणींसाठी खास शॉपिंग टिप्स
Image Credit : Pinterest

गृहिणींसाठी खास शॉपिंग टिप्स

आपण दुकानात जातो तेव्हा फक्त गरजेच्या वस्तूच आणू, असं ठरवून घराबाहेर पडतो. पण दुकानात गेल्यावर काही मिनिटांतच लिस्टमध्ये नसलेल्या वस्तूही आपल्या बास्केटमध्ये येतात.

'ही ऑफर छान आहे', 'किंमत कमी आहे', 'हे नाही घेतलं तर नुकसान होईल' असा विचार करून आपण वस्तू खरेदी करतो. महिन्याच्या शेवटी हिशोब केल्यावर ही रक्कम खूप मोठी दिसते.

घरखर्च सांभाळणाऱ्या गृहिणींना किराणा, सौंदर्यप्रसाधने, घरगुती वस्तू आणि मुलांच्या वस्तूंचा सतत खर्च असतो.

शॉपिंगच्या काही सवयी बदलल्या तर तुम्ही अनावश्यक खर्च टाळून दर महिन्याला ५,००० रुपयांपर्यंत बचत करू शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
29
दुकानात जाण्यापूर्वी लिस्ट तयार करा
Image Credit : Pinterest

दुकानात जाण्यापूर्वी लिस्ट तयार करा

दुकानात जाण्यापूर्वी फक्त ही एक सवय लावून घ्या. अनावश्यक वस्तूंवर होणारा खर्च तुम्ही सहज कमी करू शकता.

शॉपिंगला जाण्यापूर्वी घरात आधीपासून कोणत्या वस्तू आहेत, ते एकदा तपासा. तांदूळ, डाळ, तेल, मसाले ते साबण आणि वॉशिंग पावडरपर्यंत काय शिल्लक आहे आणि खरोखर कशाची गरज आहे, हे पाहून फक्त आवश्यक वस्तूंची यादी बनवा.

दुकानात गेल्यावर आकर्षक पॅकिंग, 'बाय वन गेट वन फ्री' सारख्या ऑफर्स पाहून मोह होऊ शकतो. अशा वेळी थोडं सावध राहायला हवं.

  • ही वस्तू माझ्या लिस्टमध्ये आहे का?
  • ती घरात आधीपासून आहे का?

आणि मला आता खरोखरच तिची गरज आहे का? हे तीन प्रश्न स्वतःला नक्की विचारा.

गरज नसेल तर ती वस्तू तिथेच सोडून द्या. या छोट्याशा सवयीमुळे तुम्ही फक्त गरजेच्या वस्तूंवरच खर्च कराल.

Related Articles

Related image1
Online Offer : ॲमेझॉन-फ्लिपकार्ट सेलमध्ये अशी करा खरेदी, दिवाळी बोनसइतकी होईल बचत
39
भूक नियंत्रणात असेल तर शॉपिंगचा खर्चही आटोक्यात राहील
Image Credit : Pinterest

भूक नियंत्रणात असेल तर शॉपिंगचा खर्चही आटोक्यात राहील

ही खूप छोटी गोष्ट वाटते ना? पण शॉपिंगचा खर्च वाढवणाऱ्या सवयींपैकी ही एक सवय आहे.

तुम्ही भुकेल्या पोटी सुपरमार्केटमध्ये गेलात, तर तुमची नजर गरजेच्या वस्तूंवर पडत नाही. चॉकलेट, बिस्किटे, चिप्स, कोल्ड्रिंक्स अशा वस्तूंवरच तुमची नजर खिळते.

'हे पण घेऊया, मुलांना आवडेल, ऑफर आहे' असा विचार करून तुम्ही बास्केटमध्ये वस्तू टाकता आणि शेवटी बिल वाढतं.

त्यामुळे शॉपिंगला जाण्यापूर्वी घरातूनच पोटभर जेवून निघा. पोट भरलेलं असेल तर फक्त गरजेच्या वस्तू घेण्यावर तुमचं लक्ष केंद्रित होईल. अनावश्यक खरेदी टळली की महिन्याच्या शेवटी तुमची बचत नक्कीच वाढेल.

49
ऑफर्स पाहून नाही, तर गरज ओळखून खरेदी करा
Image Credit : Pinterest

ऑफर्स पाहून नाही, तर गरज ओळखून खरेदी करा

'बाय वन गेट वन फ्री', '५० टक्के सूट', 'मेगा ऑफर' असे बोर्ड आपल्याला नेहमीच आकर्षित करतात. पण या ऑफर्समुळे खरोखरच आपली बचत होते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कोणतीही वस्तू बास्केटमध्ये टाकण्यापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारा - 'मला खरोखरच या वस्तूची गरज आहे का?'

गरज असेल तरच ऑफरचा फायदा घ्या. पण अजिबात गरज नसलेली वस्तू तुम्ही ५० टक्के सवलतीत घेतली, तरी ती तुमची बचत नसते, तर तो तुमचा अनावश्यक खर्च असतो.

59
मोठं पॅकेट म्हणजे नेहमीच बचत नसते
Image Credit : Pinterest

मोठं पॅकेट म्हणजे नेहमीच बचत नसते

जास्त प्रमाणात वस्तू घेतल्यावर जास्त बचत होते, असा आपला समज असतो. पण ती वस्तू न वापरता तशीच पडून राहिली आणि खराब झाली, तर तुमची बचत थेट खर्चात बदलते.

किराणा माल, भाज्या, फळे, दुग्धजन्य पदार्थ आणि स्नॅक्स खरेदी करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्या.

'कोणती वस्तू स्वस्त आहे' यापेक्षा 'आपण ती किती वापरणार आहोत' याचा विचार करा. एका महिन्यात घरात किती तांदूळ, डाळ, तेल किंवा पीठ लागतं, याचा अंदाज घ्या आणि त्यानुसारच खरेदी करा.

मोठं पॅकेट म्हणजे मोठी बचत नसते. पूर्णपणे वापरली जाणारी वस्तूच तुमची खरी बचत असते.

69
घरात असलेल्या वस्तूंचा आधी वापर करा
Image Credit : Pinterest

घरात असलेल्या वस्तूंचा आधी वापर करा

'अरेच्चा, हे तर घरात आधीपासूनच होतं', असं शॉपिंग करून आल्यावर तुम्हाला कधी वाटलंय का?

नवीन वस्तू आणण्यासाठी दुकानात जाण्यापूर्वी, एकदा किचनचे डबे, फ्रिज आणि स्टोअर रूम तपासून पाहा. घरात असलेली वस्तू नजरेस न पडल्यामुळे आपण तीच वस्तू पुन्हा विकत घेतो.

एकच वस्तू दोन-तीन वेळा विकत घेऊन ती न वापरता तशीच ठेवली, तर पैसे आणि जागा दोन्ही वाया जातात. त्यात जर ती वस्तू एक्सपायर होणारी असेल, तर खर्च पूर्णपणे वाया जातो.

त्यामुळे नवीन खरेदी करण्यापूर्वी घरात काय शिल्लक आहे, ते नक्की शोधा. या छोट्याशा सवयीमुळे महिन्याच्या खर्चात मोठा फरक पडू शकतो.

79
ऑनलाइन शॉपिंग करताना कार्टमध्ये वस्तू ठेवून वाट पाहा
Image Credit : Pinterest

ऑनलाइन शॉपिंग करताना कार्टमध्ये वस्तू ठेवून वाट पाहा

ऑनलाइन शॉपिंग करताना २४ तासांचा नियम पाळून पाहा.

एखादी वस्तू आवडली तर लगेच पैसे न देता, ती कार्टमध्ये ॲड करा आणि २४ तास वाट पाहा. दुसऱ्या दिवशीही तुम्हाला ती वस्तू खरोखरच गरजेची वाटली, तरच ती विकत घ्या.

या वेळेत स्वतःला विचारा - 'मला खरोखरच याची गरज आहे का? घरात याला दुसरा काही पर्याय आहे का? आता नाही घेतली तर काय होईल?'

बऱ्याचदा काही तासांनंतर आपल्याला जाणवतं की, मगाशी आवडलेली वस्तू आता नकोय.

89
महिन्याच्या खर्चाची मर्यादा ठरवून घ्या
Image Credit : Pinterest

महिन्याच्या खर्चाची मर्यादा ठरवून घ्या

'हा तर छोटासाच खर्च आहे' असा विचार करत राहिलात, तर महिन्याच्या शेवटी मोठी रक्कम गायब झालेली असते. हे टाळण्यासाठी शॉपिंगचं एक छोटं बजेट तयार करा.

किराणा सामान, घरगुती वस्तू आणि वैयक्तिक गरजा अशा प्रत्येक गोष्टीसाठी महिन्याच्या खर्चाची मर्यादा आधीच ठरवून घ्या. त्या मर्यादेत राहूनच आवश्यक वस्तूंची निवड करा. यामुळे दुकानात दिसणारी प्रत्येक वस्तू विकत घेण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळवता येईल.

शॉपिंगला मर्यादा घातली की अनावश्यक इच्छांना ब्रेक लागतो आणि बचतीचा मार्ग मोकळा होतो.

99
किमतींची तुलना करूनच खरेदी करा
Image Credit : Pinterest

किमतींची तुलना करूनच खरेदी करा

'इथे १०० रुपये आणि तिथे ८० रुपये' असं कमी किमतीचं लेबल पाहिल्यावर तुम्ही लगेच वस्तू विकत घेता का? थोडं थांबा. एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते. पण कमी किंमत म्हणजे नेहमीच कमी खर्च नसतो.

कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी जवळचं दुकान, सुपरमार्केट आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर किमतींची एकदा तुलना करून पाहा.

फक्त किंमत पाहू नका, तर पॅकेटमधील प्रमाण, वस्तूचा दर्जा, ऑनलाइन डिलिव्हरी चार्जेस आणि ऑफरच्या अटी याकडेही लक्ष द्या.

किमतींची तुलना करा.. पण संपूर्ण खर्चाचाही विचार करा. तेव्हाच तुम्हाला शॉपिंगमध्ये खरी बचत करता येईल.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mangalsutra Safety Pin : मंगळसूत्राला सेफ्टी पिन लावताय? हे वाचल्यावर पुन्हा कधीच लावणार नाही
Recommended image2
Lemon For Drishti : दृष्ट काढण्यासाठी लिंबू-मिरचीच का वापरतात? जाणून घ्या रंजक कारण
Recommended image3
Vitamin B12 Deficiency: छोट्या-छोट्या गोष्टींवर राग येतोय? हे असू शकतं कारण!
Recommended image4
Cardamom Powder : ताकात चिमूटभर वेलची पावडर मिसळून प्यायल्यास काय होते? जाणून घ्या फायदे
Recommended image5
Car Tyres Black: गाडीचे टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या कारण
Related Stories
Recommended image1
Online Offer : ॲमेझॉन-फ्लिपकार्ट सेलमध्ये अशी करा खरेदी, दिवाळी बोनसइतकी होईल बचत
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved