केसगळतीमुळे तुम्ही त्रस्त आहात का? मग तुमच्या रोजच्या आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा. यामुळे केसगळती थांबण्यास मदत होईल.
पालकमध्ये आयर्न, फोलेट आणि जीवनसत्त्वे ए, सी भरपूर प्रमाणात असतात. आयर्नच्या कमतरतेमुळे होणारी केसगळती रोखण्यासाठी पालक मदत करतो.
डाळी आणि कडधान्यांमध्ये प्रथिने, लोह आणि झिंक असते. हे घटक केसांच्या कोलेजन निर्मितीसाठी खूप आवश्यक असतात.
नट्समध्ये बायोटिन, व्हिटॅमिन ई, ओमेगा-३/६ फॅटी ॲसिड, सेलेनियम आणि झिंक असते. हे घटक केसांना मजबूत करतात आणि केस तुटण्यापासून वाचवतात.
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर असते. या बिया केसांच्या मुळांना पोषण देतात आणि टाळूची जळजळ कमी करतात.
दह्यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन डी, बी५ आणि लॅक्टिक ॲसिड असते. दही केसांना निरोगी ठेवते, खाज कमी करते आणि केसगळती नियंत्रित करते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आवळा केसांची मुळे मजबूत करतो आणि केसगळती थांबवण्यास मदत करतो.
Stroke Prevention : स्ट्रोकचा धोका टाळायचा असेल तर या 6 पदार्थांपासून दूर राहा
Glass Bangles : साडीवर शोभून दिसतील ग्लास बँगल्सच्या या ७ डिझाईन्स
Curd Side Effects : या व्यक्तींनी दह्याचे सेवन करणे टाळा, अन्यथा उद्भवेल समस्या
Gold Mangalsutra : आजकालच्या मुलींना आवडणाऱ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स