सार
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होत असल्याची समस्या उद्भवली जाते. यावर उपाय म्हणून मॉइश्चराइजर लावल्याने त्वचा मऊसर राहण्यास मदत होते. अशातच तुम्ही घरच्याघरची बदामाचे मॉइश्चराइजर तयार करू शकता.
Homemade Badam Moisturizer : थंडीच्या दिवसात त्वचेवर केमिकल फ्री मॉइश्चराइजर लावल्यास त्याचा त्वचेला फायदा होऊ शकतो. याशिवाय त्वचा कोरडी होणे ते त्वचेला आतमधून ओलसर ठेवण्यास मदत होईल. अशातच घरच्याघरी बदामाचे मॉइश्चराइजर तयार करू शकता. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. यामुळे त्वचा मऊसर होते. याशिवाय अँटी-एजींगची लक्षणेही त्वचेवर दिसून येत नाहीत. जाणून घेऊया घरच्याघरी बदामाचे मॉइश्चराइजर कसे तयार करावे स्टेप बाय स्टेप...
सामग्री
- बदामाचे तेल
- मध
- गुलाब पाणी
- नारळाचे तेल
- व्हिटॅमिन ई कॅप्सूल
कृती
- सर्वप्रथम एका वाटीमध्ये 2 चमचे बदामाचे तेल घ्या. या तेलामुळे त्वचा मऊसर होण्यास मदत होईल.
- तेलामध्ये 1 चमचा मध, गुलाब पाणी मिक्स करा.
- त्वचा अधिकच कोरडी झाली असल्यास 1 चमचा नारळाचे तेलही घ्या. यामुळे त्वचेला आतमधून ओलसरपणा मिळेल.
- बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. यामुळे त्वचेला अँटी-ऑक्सिडेंट्स मिळतात.
- सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करुन घ्या. जेणेकरुन मऊसर बदामाचे मॉइश्चराइजर तयार होईल.
बदामाचे मॉइश्चराइजर लावण्याचे फायदे
- बदामाचे तेल आणि मध मिक्स केल्याने त्वचा सखोल मऊसर होण्यास मदत होते.
- बदामाच्या मॉइश्चराइजरमुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.
- व्हिटॅमिन ई आणि बदामाचे तेल अँटी-एजींगची लक्षणे दूर करण्यास मदत करतात.
- नारळाचे तेल आणि मध त्वचेला नैसर्गिक रुपात ओलसरपणा देते. यामुळे त्वचा चमकदार होते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
डोळ्यांना रोज काजळ लावल्याने कोणते तोटे होतात, माहिती घ्या करून