सार

भिजवलेले बदाम आणि अक्रोड हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. बदाम मेंदू, त्वचा आणि वजन नियंत्रणासाठी चांगले असतात, तर अक्रोड हृदय, रोगप्रतिकारशक्ती आणि झोपेसाठी फायदेशीर आहेत. दोन्हीचे फायदे मिळवण्यासाठी, सकाळी दोन्ही खाणे चांगले.

रिकाम्या पोटी रोज सकाळी आपण कोणते पदार्थ खातो यावरून आपल्या आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. म्हणूनच, अनेक लोक सकाळी लवकर ब्लॅक कॉफी, बिया, ओट्स आणि सुकामेवा खाणे पसंत करतात. काही लोक सकाळी भिजवलेले बदाम आणि अक्रोड खाणे अधिक चांगले मानतात. पण यापैकी कोणता जास्त प्रभावी आहे? बदाम आणि अक्रोड हे दोन्ही सुपरफूड्स आहेत, पण ते कोणते खावे हे तुमच्या गरजांवर अवलंबून असते. चला जाणून घेऊया दोघांचे फायदे आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे.

भिजवलेल्या बदामाचे फायदे

१.पोषणमूल्ये:

भिजवलेल्या बदामामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यातील फायबर पचनासाठी फायदेशीर असतो.

२. स्मरणशक्तीसाठी आणि मेंदुच्या आरोग्यासाठी:

बदामात व्हिटॅमिन ई आणि फॉस्फरस असतो, जो मेंदूची कार्यक्षमता सुधारतो. मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात चांगला सकाळी खाल्ला जाणारा पदार्थ आहे.

३. त्वचेसाठी फायदेशीर:

व्हिटॅमिन ई त्वचेला तेजस्वी बनवते आणि त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते.

४. वजन नियंत्रणासाठी:

बदाम खाल्ल्याने भूकेची भावना कमी होते, ज्यामुळे जास्त खाणे टाळले जाते.

५. पचन सुधारते:

भिजवलेल्या बदामाचे साल काढल्याने त्यातील टॅनिन निघून जाते, ज्यामुळे पोषक तत्त्वे शरीरात चांगल्या प्रकारे शोषली जातात.

६. हृदयाच्या आरोग्यासाठी:

बदाम वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतो आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतो, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

आणखी वाचा- सर्दी-खोकला एका दिवसात होईल गायब, करा हे 3 रामबाण उपाय

अक्रोडाचे फायदे

अक्रोड हे पोषणदृष्ट्या समृद्ध आहे आणि त्यामध्ये ओमेगा-3 फॅटी  अ‍ॅसिड, प्रथिने, अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय, ते मेलाटोनिनचा चांगला स्रोत आहे.

१. मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर:

अक्रोडला “ब्रेन फूड” म्हणतात, कारण त्याचा आकार मेंदूसारखा असतो. हा स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यात मदत करतो.

२. हृदयासाठी फायदेशीर:

अक्रोडातील ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड हृदय मजबूत बनवते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते.

३. रोगप्रतिकारशक्तीसाठी:

अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

४. डायबेटिसमध्ये फायदेशीर:

अक्रोड रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करतो, त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे.

५. चांगल्या झोपेसाठी:

मेलाटोनिनने भरपूर असल्याने अक्रोड झोप सुधारण्यास मदत करतो.

आणखी वाचा- हिवाळ्यात कोणता आहार घ्यावा? जाणुन घ्या सोपा डाएट प्लॅन

काय खावे आणि काय नाही?

  • जर तुम्हाला मेंदु तेज करायचा, वजन कमी करायचं किंवा त्वचा सुधारायची असेल तर भिजवलेले बदाम खा.
  • पण जर तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी करायचा, झोप सुधारायची किंवा ओमेगा-3 मिळवायचा असेल तर अक्रोड खा.
  • तुम्ही दोन्हीही खाऊ शकता. सकाळी 5 भिजवलेले बदाम आणि 2 अक्रोड खा, यामुळे तुम्हाला दोघांचेही फायदे मिळतील.    

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णतः सत्य आणि अचूक असल्याचा आम्ही दावा करत नाही. ही माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या