झणझणीत अशी खांदेशी पद्धतीची शेव भाजी, नोट करा सोपी रेसिपी

| Published : Jul 26 2024, 10:02 AM IST

Shev Bhaji Recipe in Marathi

सार

Shev Bhaji Recipe : खांदेशातील प्रसिद्ध अशी खांदेशी शेव भाजी बहुतांशजण आवडीने खातात. आज घरच्याघरी झणझणीत आणि तिखट अशी शेव भाजी तयार कशी करायची याची रेसिपी आणि सामग्री जाणून घेऊया सविस्तर...

Shev Bhaji Recipe : खांदेशी ठेचा, खांदेशी चटणी अथवा शेव भाजी हे महाराष्ट्रातील खांदेशातील आवडीचे पदार्थ. अशातच तुम्हाला घरच्याघरी झणझणीत आणि रस्सेदार अशी शेव भाजी तयार करायची असल्यास त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया सविस्तर…

साहित्य : 

  • अर्धा वाटी सुक खोबर
  • तेल
  • दोन चिरलेले कांदे
  • आलं
  • लसूण
  • एक टेबलस्पून खांदेशी काळा मसाला
  • लाल तिखट
  • गरम पाणी
  • जाड शेव
  • चवीनुसार मीठ

कृती

  • सर्वप्रथम गॅसवर कढई मध्यम आचेवर गरम करा
  • कढईत खोबर लालसर होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर भाजलेले खोबर थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या.
  • कढईत तेल गरम करत त्यामध्ये कांदा, आलं, लसूण मध्यम आचेवर भाजून घ्या. यावेळी कांदा लालसर होईपर्यंत भाजा.
  • कढईतील साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घ्या.
  • कढईमध्ये पुन्हा तेल टाकून त्यामध्ये कांदा-लसूणचे वाटण आणि सुके खोबरे टाकून भाजा. यानंतर लाल तिखट, खांदेशी काळा मसाला व्यवस्थितीत भाजून घ्या.
  • कढईतील सर्व सामग्री 3-5 मिनिटे भाजताना त्यामधून तेल सुटण्यास सुरुवात होईल. आता पातळ अथवा घट्ट रस्सानुसार पाणी टाका.
  • कढईतील सर्व साहित्य व्यस्थितीत शिजल्यानंतर गॅस बंद करुन त्यामध्ये शेव टाका.
  • अशाप्रकारे घरच्याघरी आणि सोप्या पद्धतीने तुमची रस्सा शेव भाजी तयार होईल. शेव भाजी कांदा, लिंबू आणि भाकरीसोबत नक्कीच टेस्ट करून बघा.

Watch Shev Bhaji Recipe Video : 

View post on Instagram
 

आणखी वाचा : 

प्रेशर कुकरमध्ये लुसलुशीत केक तयार करण्यासाठी खास टिप्स

पातळ आणि क्रिस्पी डोसा तयार करण्यासाठी खास 7 टिप्स