Marathi

प्रेशर कुकरमध्ये लुसलुशीत केक तयार करण्यासाठी खास टिप्स

Marathi

घरच्याघरी तयार करा केक

घरच्याघरी केक तयार करण्यासाठी बहुतांशजणांकडे ओव्हन नसल्याने काहीवेळेस बाहेरुन ऑर्डर करावा लागतो. पण ओव्हनशिवायही प्रेशर कुकरमध्ये केक तयार करता येतो.

Image credits: Instagram
Marathi

प्रेशर कुकरमध्ये केक तयार करण्यासाठी खास टिप्स

प्रेशर कुकरमध्ये केक तयार करताना तो कधीकधी व्यवस्थित फुलत नाही. यामुळे केक विस्कटला जातो. अशातच कुकरमध्ये केक तयार करण्यासाठी कोणत्या खास टिप्स फॉलो कराव्यात हे जाणून घेणार आहोत.

Image credits: Instagram
Marathi

योग्य कुकरचा वापर

प्रेशर कुकरमध्ये केक तयार करताना नेहमीच घट्ट झाकणाचा मोठा कुकर वापरावा. यावेळी नॉनस्टिक कुकरचा वापर करू नये. केक तयार करण्याआधी कुकर प्री-हिटही करावा.

Image credits: Instagram
Marathi

तापमानाची काळजी घ्या

प्रेशर कुकरमध्ये केक तयार करताना तापमानाची काळजी घ्या. जेणेकरुन केक व्यवस्थितीत शिजला जाईल. कुकर मध्यम आचेवर ठेवून केक तयार करावा.

Image credits: Facebook
Marathi

योग्य पीठाची निवड

मऊ आणि लुसलुशीत केक तयार करण्यासाठी मल्टीग्रेड पीठाचा वापर करावा. खरंतर, केकसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ मार्केटमध्ये मिळतात. याशिवाय केकमधील सामग्रीकडेही लक्ष द्या.

Image credits: Facebook
Marathi

स्टँडची मदत घ्या

प्रेशर कुकरमध्ये केक तयार करताना कुकिंग स्टँडची मदत घ्या. यावर केकचे बॅटर टाकलेले भांडे ठेवा.

Image credits: Instagram
Marathi

कुकर थंड होऊ द्या

प्रेशर कुकरमध्ये केक तयार करताना अजिबात घाई करू नका. अन्यथा केक बिघडला जाईल. यामुळे केक शिजल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर त्यामधून बाहेर काढा.

Image Credits: Instagram