डोसा तयार करण्यासाठी तीन कप तांदूळ आणि एक कप उडदाची डाळ घेऊन 3-4 तास भिजवून ठेवा. यानंतर मिक्सरमधून घट्ट वाटून घ्या.
क्रिस्पी डोसा तयार करण्यासाठी बॅटरमध्ये दोन चमचे शिजवलेल्या भाताची पेस्ट अथवा पोहे मिक्स करू शकता. यामुळे डोसा क्रिस्पी होतो.
डोसाचे बॅटर घट्ट असावे. यामुळे डोसा तव्यावर व्यस्थितीत सेट होतो. पातळ बॅटरमुळे डोसा तुटण्याची शक्यता अधिक वाढली जाते.
डोसा बॅटर कमीतकमी 8-10 तासांसाठी ठेवून द्या. जेणेकरुन ते व्यवस्थितीत सेट होईल. यामुळे पीठाला आंबटसर वासही येतो.
बॅटर तव्यावर टाकण्याआधी तो व्यवस्थितीत गरम होऊ द्या. अन्यथा डोसाचे बॅटर तव्याला चिकटले जाईल.
क्रिस्पी डोसा तयार करण्यासाठी बॅटर तव्यावर समान रुपात पसरवून घ्या.
डोसाची चव वाढवण्यासाठी दोन्ही बाजूने तूप अथवा तेलाचा वापर करू शकता.