Dasara वेळी शमीची पूजा आणि गुप्त दान का करतात? वाचा खास गोष्टी

| Published : Oct 12 2024, 08:39 AM IST / Updated: Oct 12 2024, 09:39 AM IST

Shami Pujan

सार

Dasara 2024 :  वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता. अशातच विजयादशमीच्या दिवशी काही खास उपास केले जातात. यामध्ये शमीच्या झाडाची पूजा आणि गुप्त दान महत्वाचे आहे.

Dasara 2024  Shami Pujan and Gupta Daan : असत्यावर सत्याचा विजय असणारा दसरा आज (12 ऑक्टोबर) साजरा केला जात आहे. या दिवशी श्रीरामांनी रावणाचा वध करत विजय प्राप्त केला होता. या दिवशी काही खास उपाय केले जातात. यामध्ये शमीच्या झाडाची पूजा आणि गुप्त दान महत्वपूर्ण आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी शमीचे रोप लावून त्याची पूजा केली जाते. शमीच्या झाडाची पूजा करण्यामागे खास महत्व आहे.

गुप्त दान का केले जाते?
असे सांगितले जाते की, रावण दहनाचा अर्थ अहंकार आणि नकारात्मक उर्जेचा अंत आहे. म्हणजेच असे दान ज्याबद्दल कोणाला काहीच सांगितले जात नाही. असे केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी येते. आयुष्यातील कर्म सुधारले जातात आणि सकारात्मक उर्जा घरात वास करते.

शमीची पूजा का करतात?
भगवान रामाने लंकेवर विजय आणि रावणाचा वध केल्यानंतर शमी झाडाची पूजा केली होती. याशिवाय पांडवांनी आपल्या अज्ञातवासादरम्यान, शमीच्या झाडामध्ये आपली अस्र-शस्र लपवली होती. याशिवाय शनिदेवांना शमीच्या झाडाची पाने अर्पण केल्याने शनिदोष दूर होतो. यंदा दसऱ्याला शनिवार असल्याने शमीची पाने शनिदेवांना अर्पण केल्यास शनीच्या साढेसातीपासून लाभ मिळेल. भगवान शंकरालाही शनीचे झाड अतिशय प्रिय आहे. यामुळे शंकरालाही शमीची पाने अर्पण करू शकता.

दसरा तिथी
सकाळी 10 वाजून 58 मिनिटांपासून ते 13 ऑक्टोबर सकाळी 09 वाजून 08 मिनिटांपर्यंत

दसऱ्यानिमित्त शुभ योग
धार्मिक मान्यतांनुसार, विजयादशमीच्या दिवशी श्रवण नक्षत्र असणे अत्यंत शुभ मानले जाते. श्रवण नक्षत्र 12 ऑक्टोबरला सकाळी 05 वाजून 25 मिनिटांनी सुरु होणार असून 13 ऑक्टोबरला पहाटे 04 वाजून 27 मिनिटांनी संपणार आहे. याशिवाय कुंभ राशीमध्ये शनि शश राजयोग, शुक्र आणि बुध लक्ष्मी नारायण योगासह शुक्र मालव्य नावाचा राजयोग जुळून आला आहे.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 
Vijayadashami 2024 : दसऱ्याला शस्र पूजा का करतात? वाचा शुभ मुहूर्तासह विधी
Dussehra वेळी दारापुढे काढा या 5 मनमोहक रांगोळी, देवी होईल प्रसन्न (Watch Video)

Read more Articles on