- Home
- lifestyle
- Surya Gochar : सप्टेंबरमध्ये सूर्याचा दुहेरी प्रवास, दिवाळीपूर्वी काही राशींचे नशीब पालटणार!
Surya Gochar : सप्टेंबरमध्ये सूर्याचा दुहेरी प्रवास, दिवाळीपूर्वी काही राशींचे नशीब पालटणार!
सप्टेंबरमध्ये सूर्याचा दुहेरी प्रवास काही राशींचे नशीब बदलणार आहे. सूर्य आता कन्या राशीत प्रवेश करणार आहे, जो प्रवेश सप्टेंबर १७ रोजी होईल. याशिवाय, सप्टेंबर १३ रोजी आणखी एक सूर्य संक्रमण आहे. याचा राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या.

सूर्य गोचर:
सध्या सूर्य सिंह राशीत तेजोमय आहे. आगामी १३ सप्टेंबरला तो उत्तरफाल्गुनी नक्षत्रातून प्रवास करत पुढे बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करेल. या हालचालीमुळे सूर्याची उर्जा व प्रभाव अधिक तीव्र होईल. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ नवे बदल, आत्मविश्वासाची वृद्धी आणि कार्यक्षमतेत वाढ घडवून आणणारा ठरू शकतो.
वृषभ
वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे संक्रमण लाभदायी ठरणार आहे. या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल आणि बचतीची संधी वाढेल. नोकरी, व्यवसाय किंवा गुंतवणूक या सर्व बाबतीत स्थैर्य लाभेल. आत्मविश्वास वाढल्याने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. एकूणच, वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ समाधान व सकारात्मकतेने भरलेला असेल.
सिंह
सिंह राशीच्या जातकांवर सूर्याची विशेष कृपा राहणार आहे. या काळात आत्मविश्वासात वाढ होईल आणि आपल्या बोलण्याच्या ताकदीमुळे महत्त्वाचे लाभ मिळतील. नवे संपर्क जोडले जातील, तर जुने संबंध अधिक दृढ होतील. कामकाजात उत्साह वाढेल आणि संधींचा योग्य फायदा घेता येईल.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल घडेल. विशेषतः कला, संगीत, लेखन किंवा सर्जनशील क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. त्यांच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळून ओळख व प्रशंसा वाढेल. एकूणच हा काळ प्रगती आणि आत्मसमाधान देणारा ठरेल.

