अंगारकी चतुर्थी २०२६: चतुर्थीच्या प्रियजनांना पाठवा शुभेच्छा, गणपतीची अशी करा पूजा
हिंदू पंचांगानुसार, मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात. पौराणिक कथेनुसार, मंगल देवाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन गणपतीने आशीर्वाद दिला की, या एका व्रताने भाविकांना वर्षभरातील सर्व २४ संकष्टी चतुर्थींचे पुण्य प्राप्त होईल

अंगारकी चतुर्थी २०२६: चतुर्थीच्या प्रियजनांना पाठवा शुभेच्छा, गणपतीची अशी करा पूजा
हिंदू पंचांगानुसार संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्यावर त्यावेळी अंगारकी चतुर्थी साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार, मंगल देवाने म्हणजे अंगारकाने भगवान गणेशाची कठोर तपश्चर्या केली होती.
अंगारकी चतुर्थीला व्रत केल्यावर काय मिळतं?
मंगल देवाने म्हणजे अंगारकाने भगवान गणेशाची कठोर तपश्चर्या केली होती. त्याच्या या अनन्यसाधारण भक्तीवर प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने त्याला असा आशीर्वाद दिला.
एकाच व्रताने मिळेल पुण्य
एकाच व्रताने आपल्याला पुण्य मिळणार आहे. जो कोणी मंगळवारी येणाऱ्या या चतुर्थीचे व्रत करेल, त्याला वर्षभरातील सर्व 24 संकष्टी चतुर्थींचे पुण्य केवळ एकाच व्रताने प्राप्त होईल. यामुळेच अंगारकी चतुर्थीचा योग हा सर्व संकष्टींमध्ये अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातो.
या दिवशी प्रिय लोकांना पाठवा संदेश
संकटांचा नाश करणारे, विघ्नहर्ता गणराया आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि यश घेऊन येवोत.
शुभ अंगारकी चतुर्थी!
श्री गणेशाच्या कृपेने आपली सर्व कार्ये निर्विघ्न पार पडोत, हीच मनापासून प्रार्थना.
शुभ अंगारकी चतुर्थी!
श्री गणरायाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होवोत
विघ्नहर्ता, सुखकर्ता, मंगलमूर्ती श्री गणरायाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होवोत, प्रत्येक पाऊल यशाकडे जावो आणि मनात सदैव सकारात्मकता नांदो.
अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा
अंगारकी चतुर्थीच्या या पावन दिवशी बाप्पा आपल्यावर कृपादृष्टी ठेवून आरोग्य, समाधान, समृद्धी आणि कौटुंबिक आनंद भरभरून देवोत.

