MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Sugar Craving Science : अपुरी झोप, ताणतणाव आणि गोड खाण्याची इच्छा... काय आहे यामागचं विज्ञान?

Sugar Craving Science : अपुरी झोप, ताणतणाव आणि गोड खाण्याची इच्छा... काय आहे यामागचं विज्ञान?

ऑफिसमधील थकवणारे काम, ताणतणाव आणि अपुऱ्या झोपेनंतर आपल्याला अचानक चॉकलेट किंवा गोड खावंसं का वाटतं? यामागच्या शास्त्रीय कारणांचा आढावा…

2 Min read
Author : Karishma R
Published : Nov 18 2026, 03:02 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
गोड खाण्याची तीव्र इच्छा का होते?
Image Credit : chatgpt

गोड खाण्याची तीव्र इच्छा का होते?

खूप वेळ ऑफिसचं काम, अभ्यास किंवा कठीण व्यायाम केल्यानंतर अचानक चॉकलेट, बिस्किट किंवा गोड काहीतरी खाण्याची इच्छा का होते? हे केवळ तुमचं स्वत:वर नियंत्रण नसल्यामुळे होत नाही; यामागे मेंदूमधील रासायनिक बदल कारणीभूत असतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
मेंदू गोड पदार्थांची मागणी का करतो?
Image Credit : chatgpt

मेंदू गोड पदार्थांची मागणी का करतो?

मेंदूचं वजन शरीराच्या एकूण वजनाच्या फक्त २% असतं, पण आपण विश्रांती घेत असतानाही तो शरीराच्या एकूण ऊर्जेपैकी २०% ऊर्जा वापरतो. मेंदूचं मुख्य इंधन ग्लुकोज असलं तरी, मानसिक थकवा येतो तेव्हा मेंदूत ग्लुकोज कमी झालंय असा त्याचा अर्थ नसतो. 'घ्रेलिन' (Ghrelin) हा भूक वाढवणारा आणि 'लेप्टिन' (Leptin) हा पोट भरल्याची जाणीव देणारा हार्मोन भूक नियंत्रित करतात. पण गोड खाण्याच्या इच्छेमागे मेंदूची 'रिवॉर्ड सिस्टिम' (Reward system) मुख्य कारण असते.

डोपामिन, मानसिक थकवा आणि अपुरी झोप:

गोड पदार्थ मेंदूतील आनंद आणि उत्साहाशी संबंधित 'डोपामिन' (Dopamine) या रसायनाला चालना देतात. जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या थकतो, तेव्हा मेंदू तात्काळ आराम आणि आनंद शोधत असतो, त्यामुळे आपल्याला गोड पदार्थांची ओढ लागते.

तसेच, दीर्घकालीन ताणतणावाच्या (Stress) वेळी स्रवणारा 'कॉर्टिसोल' (Cortisol) हार्मोन आपल्याला साखर आणि चरबीयुक्त पदार्थ खाण्यास प्रवृत्त करतो. अपुऱ्या झोपेमुळेही भुकेच्या हार्मोन्समध्ये बदल होतो आणि गोड खाण्याची इच्छा वाढते.

Related Articles

Related image1
Uric Acid : युरिक ॲसिड वाढवणारे पदार्थ, चुकूनही खाऊ नका
Related image2
Eye Care Tips : तासनतास मोबाईल पाहताय? डोळ्यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांनी दिले महत्त्वाचे सल्ले
34
व्यायामानंतर होणारी इच्छा वेगळी असते का?
Image Credit : chatgpt

व्यायामानंतर होणारी इच्छा वेगळी असते का?

कठोर व्यायामादरम्यान स्नायूंमध्ये साठलेली 'ग्लायकोजेन' (Glycogen) ऊर्जा खर्च होते. ती भरून काढण्यासाठी शरीराला कार्बोहायड्रेट्स आणि गोड पदार्थांची गरज भासते, ही एक नैसर्गिक शारीरिक गरज आहे. पण, मानसिक थकव्यामुळे येणारी गोड खाण्याची इच्छा म्हणजे फक्त मेंदूने शोधलेला आराम असतो.

गोड खाल्ल्याने खरोखर ऊर्जा मिळते का?

गोड खाल्ल्याने तात्काळ ऊर्जा मिळेल असं आपल्याला वाटत असलं तरी, २०१९ च्या एका अभ्यासानुसार, साखर आणि कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ आपला मूड सुधारत नाहीत; उलट, ते खाल्ल्यानंतर पहिल्या एक तासात तरतरी कमी होऊन थकवाच वाढतो.

44
यावर नियंत्रण कसं मिळवावं?
Image Credit : chatgpt

यावर नियंत्रण कसं मिळवावं?

मानसिक थकवा आल्यावर चॉकलेट, गोड पदार्थ शोधण्याऐवजी प्रोटीन, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सयुक्त संतुलित आहार घ्यावा. पुढच्या वेळी गोड खावंसं वाटेल, तेव्हा तुमच्या मेंदूला खरोखरच साखरेची गरज आहे की पुरेशा पाण्याची, चांगल्या झोपेची आणि थोड्या विश्रांतीची गरज आहे, याचा विचार करूनच निर्णय घ्या.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Saree Designs : या साड्या एकदा नेसाच... तुमचं सौंदर्य आणखी खुलवणाऱ्या डिझाइन्स
Recommended image2
Blouse Designs : साडीचे सौंदर्य दुप्पट करणारे ब्लाऊज नेक डिझाइन्स
Recommended image3
Cashew vs Peanuts : काजू की शेंगदाणे, कशात जास्त पोषक तत्त्वं? कोणासाठी काय बेस्ट?
Recommended image4
Uric Acid : युरिक ॲसिड वाढवणारे पदार्थ, चुकूनही खाऊ नका
Recommended image5
Chanakya Niti : चाणक्य नीती: तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही; या 6 प्रसंगी गप्प राहा
Related Stories
Recommended image1
Uric Acid : युरिक ॲसिड वाढवणारे पदार्थ, चुकूनही खाऊ नका
Recommended image2
Eye Care Tips : तासनतास मोबाईल पाहताय? डोळ्यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांनी दिले महत्त्वाचे सल्ले
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved