आपल्या शरीरात प्युरीनयुक्त पदार्थांच्या पचनानंतर युरिक ॲसिड तयार होते. शरीरात युरिक ॲसिड वाढल्यास सांध्यांमध्ये जमा होऊन अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.
मुंबई : आपण जे अन्न खातो, त्यावर आपले आरोग्य ठरते. रक्तात युरिक ॲसिड वाढल्यामुळे सांधेदुखीचा त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही अन्नपदार्थांमध्ये आणि पेयांमध्ये आढळणाऱ्या प्युरिन्सच्या पचनानंतर शरीरात तयार होणारा नैसर्गिक टाकाऊ पदार्थ म्हणजे युरिक ॲसिड.
जेव्हा शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते, तेव्हा ते सांध्यांमध्ये जमा होते आणि अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. रक्तातील युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी कमी प्युरीन असलेले पदार्थ निवडावे आणि जास्त प्युरीन व साखर असलेले पदार्थ टाळावेत.
युरिक ॲसिड वाढवणारे पदार्थ -
1. सीफूड (Seafood)
खेकडे, शिंपले, कोळंबी यांसारख्या सीफूडमध्ये मोठ्या प्रमाणात प्युरिन्स असतात. यामुळे युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. त्यामुळे असे पदार्थ नियमित खाणे टाळावे.
2. रेड मीट (Red Meat)
रेड मीटमध्ये भरपूर प्युरीन असते, ज्यामुळे शरीरात युरिक ॲसिड तयार होते. हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने सांधेदुखी वाढू शकते. त्यामुळे याचा वापर कमी करा.
3. पॅकेज्ड फूड (Packaged Food)
पॅकेज्ड फूड जास्त प्रमाणात खाल्ल्यानेही शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढते.
4. साखर (Sugar)
जास्त गोड पदार्थ खाणाऱ्या लोकांमध्ये युरिक ॲसिड वाढण्याची शक्यता असते.
5. गोड पेये (Sugary Drinks)
जास्त फ्रक्टोज असलेली पेये प्यायल्याने शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते.
6. प्रक्रिया केलेले अन्न (Processed Food)
प्रक्रिया केलेले अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते.
7. रिफाइंड कार्बोहायड्रेट्स (Refined Carbohydrates)
युरिक ॲसिड जास्त असलेल्या लोकांनी रिफाइंड कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ आहारातून वगळावेत.
8. मद्यपान (Alcohol)
जास्त मद्यपानामुळेही शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते.












