भाजलेले चणे आणि मध खाण्याचे आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून सविस्तर इन्फो
Roasted Chana and Honey Benefits : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात बहुतांशजणांना आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. अशातच हेल्दी खाण्याचे मनं करत असेल भाजलेल्या चण्यांसोबत मधाचे सेवन करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

वजन नियंत्रित राहण्यास मदत
भाजलेल्या चण्यांमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.याशिवाय मधामुळे शरीराला ऊर्जा मिळते.या दोन्ही गोष्टींचे एकत्रित सेवन केल्याने अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.
पचनक्रिया सुधारते
भाजलेले चणे पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्त्वे असतात. मध नैसर्गिक प्रोबायोटिकसारखे कार्य करतो, त्यामुळे पाचनक्रिया सुधारते.
हाडांना बळकटी मिळते
चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस अशी पोषण तत्त्वे असतात. यामुळे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. तर मध हाडांमधील सूज कमी करण्यास मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. भाजलेले चणे प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
त्वचेसाठी फायदेशीर
मध त्वचेला आतून पोषण देते आणि चण्यामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत होते.
असे करा सेवन
- एका वाटीत 1 कप भाजलेले चणे घ्या.
- चण्यांमध्ये 1 ते 2 चमचे शुद्ध मध मिसळा.
- चांगले मिक्स करून नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी खा.
- रोज सकाळी रिकाम्या पोटी थोड्या प्रमाणात खाल्ल्यास अधिक फायदा होतो.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

