MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Medicine Mistakes : गोळ्या घेताना किती पाणी प्यावं? या चुका अजिबात करू नका

Medicine Mistakes : गोळ्या घेताना किती पाणी प्यावं? या चुका अजिबात करू नका

आजारी पडल्यावर आपण वेळेवर औषधं घेतो. पण ती घेण्याची पद्धत चुकली तर? गोळ्या घेताना नकळत होणाऱ्या चुकांमुळे औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 07 2026, 02:38 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
औषधं कशी घ्यावीत?
Image Credit : Asianet News

औषधं कशी घ्यावीत?

डॉक्टर देतात ती औषधं आपण वेळेवर घेतो. पण ती कशी घ्यावीत, याकडे आपलं लक्ष नसतं. गोळी कशासोबत घ्यावी, किती पाणी प्यावं आणि गोळी घेतल्यावर लगेच झोपावं का? या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. औषधं घेताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
किती पाणी प्यावं?
Image Credit : Pixabay

किती पाणी प्यावं?

गोळ्या किंवा कॅप्सूल नेहमी साध्या पाण्यासोबतच घ्या. तुम्ही भरपूर पाणी प्यायल्यास गोळी घशात किंवा अन्ननलिकेत न अडकता थेट पोटात जाते. कमी पाण्यासोबत गोळी गिळली, तर ती अन्ननलिकेत अडकण्याचा धोका असतो. यामुळे घशात जळजळ किंवा वेदना होऊ शकतात. काही औषधांमुळे अन्ननलिका आणि पोटाच्या आतील थराला त्रास होऊ शकतो, त्यामुळे पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे ठरते.

गोळी सहज पोटात जावी यासाठी नेहमी पुरेसं पाणी प्या. तज्ज्ञांच्या मते, ६० मिली पेक्षा कमी पाण्यासोबत गोळी घेतल्यास काही वेळा त्रास होऊ शकतो. तरीही, औषधाच्या कव्हरवर दिलेल्या सूचना किंवा डॉक्टरांचा सल्ला नेहमी पाळा.

Related Articles

Related image1
Generic Medicine : जेनेरिक औषधं म्हणजे काय? ब्रँडेड आणि जेनेरिकमध्ये नेमका फरक काय?
33
चहा, दुधासोबत औषधं घ्यावीत का?
Image Credit : Pixabay

चहा, दुधासोबत औषधं घ्यावीत का?

अनेकांना चहा, कॉफी किंवा दुधासोबत औषधं घेण्याची सवय असते. पण दूध आणि चहामुळे काही औषधांचा शरीरावरील प्रभाव कमी होतो. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषधं साध्या पाण्यासोबतच घ्या.

इतर महत्त्वाच्या गोष्टी: गोळी गिळल्यावर लगेच झोपू नका. यामुळे गोळी अन्ननलिकेत अडकून जळजळ होऊ शकते.

गोळ्या तोडून खाऊ नका - गोळी मोठी आहे म्हणून ती तोडून किंवा कॅप्सूल उघडून खाऊ नका. काही गोळ्या शरीरात विशिष्ट पद्धतीने विरघळण्यासाठी बनवलेल्या असतात. त्यामुळे डॉक्टर किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्याशिवाय यात बदल करू नका.

तुमच्या या छोट्या सवयी औषधांच्या प्रभावावर मोठा परिणाम करू शकतात. त्यामुळे गोळ्या घेण्याची वेळ आणि पद्धत यावर लक्ष द्या.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Death Cap Mushroom : जगातील सर्वात विषारी मशरुम, ठरू शकतो जीवघेणा
Recommended image2
Property Horoscope : स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण... या 7 राशींना आहे संपत्तीचा योग!
Recommended image3
Human Body Facts : शरीराच्या 'या' अवयवांमध्ये रक्त नसतं, उत्तर ऐकून थक्क व्हाल!
Recommended image4
Early Period Symptoms : मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी शरीरात दिसतात ही लक्षणे
Recommended image5
Gold Mangalsutra : फक्त 3 ग्रॅम सोन्यात मंगळसूत्राच्या सुंदर डिझाईन्स
Related Stories
Recommended image1
Generic Medicine : जेनेरिक औषधं म्हणजे काय? ब्रँडेड आणि जेनेरिकमध्ये नेमका फरक काय?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved