MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Generic Medicine : जेनेरिक औषधं म्हणजे काय? ब्रँडेड आणि जेनेरिकमध्ये नेमका फरक काय?

Generic Medicine : जेनेरिक औषधं म्हणजे काय? ब्रँडेड आणि जेनेरिकमध्ये नेमका फरक काय?

जेनेरिक औषधांबद्दल आजही अनेकांना पुरेशी माहिती नाही. पण सर्वसामान्यांसाठी ही औषधं म्हणजे एक मोठा आधार आहेत. जेनेरिक आणि ब्रँडेड औषधांमध्ये नेमका काय फरक असतो? जेनेरिक औषधं म्हणजे नक्की काय?

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 04 2026, 12:14 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
जेनेरिक औषधं म्हणजे काय?
Image Credit : Asianet News

जेनेरिक औषधं म्हणजे काय?

आजारपणात आपण जे औषध घेतो, त्यात आजार बरा करणारं एक मुख्य रसायन असतं. उदाहरणार्थ, ताप कमी करण्यासाठी आपण 'पॅरासिटामॉल' वापरतो. एखादी कंपनी अनेक वर्षांच्या संशोधनानंतर नवीन औषध शोधते, तेव्हा ती कंपनी त्याचं पेटंट घेते आणि स्वतःच्या ब्रँड नावाने ते विकते. रेड्डीज लॅब, अरबिंदो यांसारख्या ब्रँडेड कंपन्या जास्त किंमत लावून ही औषधं विकतात. या पेटंटची मुदत २० वर्षांपर्यंत असते. ही मुदत संपल्यावर इतर कंपन्या तोच फॉर्म्युला वापरून औषध बनवतात. याच औषधांना 'जेनेरिक औषधं' म्हणतात. यावर कोणाचंही पेटंट नसतं, त्यामुळे ती खूप स्वस्त मिळतात. ब्रँडेड औषधांइतकाच त्यांचा प्रभाव असतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांमधील फरक
Image Credit : Pixabay

ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांमधील फरक

ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांमध्ये मुख्य फरक त्यांच्या किंमतीत आणि मार्केटिंगमध्ये असतो. ब्रँडेड औषधं बनवणारी कंपनी संशोधन, डॉक्टरांकडे मार्केटिंग आणि आकर्षक पॅकिंगवर खूप पैसा खर्च करते. त्यामुळे ही औषधं महाग होतात. दुसरीकडे, जेनेरिक औषधांसाठी मार्केटिंग किंवा संशोधनाचा खर्च नसतो. त्यामुळे ती ब्रँडेड औषधांपेक्षा ५० ते ८० टक्के स्वस्त मिळतात. या दोन्ही औषधांचा रंग, आकार किंवा चवीत थोडा फरक असू शकतो, पण आतला मुख्य औषधी घटक मात्र अगदी सारखाच असतो.

33
सर्वसामान्यांसाठी फायदे
Image Credit : Pixabay

सर्वसामान्यांसाठी फायदे

जेनेरिक औषधं स्वस्त मिळतात, त्यामुळे त्यांचा दर्जा कमी असेल असा अनेकांचा गैरसमज असतो. पण सरकारी औषध नियंत्रण संस्थांच्या नियमांनुसार, ब्रँडेड औषध जेवढं प्रभावी असतं, तेवढ्याच वेगाने जेनेरिक औषधही शरीरात काम करतं. डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या आजारांमध्ये रुग्णांना कायम औषधं घ्यावी लागतात. अशा रुग्णांसाठी जेनेरिक औषधं एखाद्या वरदानासारखी आहेत. सध्या सरकारने सुरू केलेल्या 'प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर' आणि जेनेरिक मेडिकल स्टोअर्समध्ये ही औषधं सहज मिळतात. कमी खर्चात चांगला उपचार घेण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Modern Vastu Tips : नशीब बदलणाऱ्या मॉडर्न वास्तू टिप्स; घरात ठेवा पंचमहाभूतांचा समतोल
Recommended image2
Mixer Jar Cleaning : मिक्सरच्या जारचा खालचा भाग काळा पडलाय? स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स
Recommended image3
Numerology Weekly Predictions : तुमची जन्मतारीख सांगेल भविष्य; कसा असेल तुमचा हा आठवडा?
Recommended image4
Numerology Secrets : लहान वयातच यश मिळवणाऱ्या जन्म तारखा.. तुमची तारीख यात आहे का?
Recommended image5
Esophageal Cancer : गरम चहा-कॉफी पिताय? सावधान, या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved