सार

Diwali 2023 Pujan Samagri : दिवाळीच्या पूजेमध्ये अनेक साहित्याचा उपयोग केला जातो. कधी-कधी घाईगडबडीत एखादे सामान विकत आणणे आपण विसरतो. म्हणूनच दिवाळीच्या पूजेची सर्व सामग्री आजच घरी आणून ठेवा. कोणकोणते साहित्य आणायचे आहे, याची नीट नोंद करून घ्या.

Diwali 2023 Puja Samagri In Marathi : आश्विन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी दीपोत्सव (Diwali Puja Vidhi 2023) साजरा केला जातो. यंदा ही तिथि रविवारी म्हणजे 12 नोव्हेंबरला (Diwali Date And Time) आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. लक्ष्मीपूजन केल्यानं घरातील सुख-समृद्धीत वाढ होते, असे मानले जाते. 

लक्ष्मीपूजन विधिवत पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या पूजा सामग्रीचा समावेश केला जातो. पण काही लोक ऐन वेळेस घाईगडबडीत काही-न्-काही साहित्य विकत आणण्यास हमखास विसरतात. या गोष्टी टाळण्यासाठी पूजेचे साहित्य एक-दोन दिवस आधीच विकत आणा. पूजेसाठी कोणकोणत्या सामग्रीची आवश्यकता असते, जाणून घेऊया सविस्तर माहिती…

VIDEO : लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

View post on Instagram
 

लक्ष्मीपूजनासाठी कोणकोणती सामग्री आणावी, याची करून घ्या नोंद (Diwali 2023 Pujan Samagri List)

  • दीपोत्सवातील (Diwali Puja Samagri List) लक्ष्मीपूजनासाठी (Lakshmi Puja Samagri List In Marathi) देशातील काही भागांमध्ये लक्ष्मी मातेच्या मूर्तीची तर काही ठिकाणी प्रतिमेची पूजा केली जाते. आपण आपल्या सोयीनुसार यापैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड करावी. काही ठिकाणी लक्ष्मी देवीसह कुबेरदेवाची ही पूजा केली जाते.
  • पूजेसाठी हातावर बांधायचा धागा, मध, दही, गंगाजल, गूळ, हळद-कुंकू, चंदन, अबीर, गुलाल, अक्षता, विड्याचे पान, पूजेची सुपारी, धूप, कापूर, अगरबत्ती, दिवे, श्रीफळ, लवंग, वेलची, कापूस या सर्व गोष्टी असणे गरजेचं आहे.
  • याव्यतिरिक्त कलश, कमळगट्ट्याची माळ, अत्तर, चौरंग, चांदीचे नाणे, शंख, आसन, थाळी, बसण्यासाठी आसन, आंब्याच्या डहाळ्या आणि 11 दिव्यांचाही पूजा (Diwali Puja Vidhi 2023) साहित्याच्या यादीत समावेश करावा.

VIDEO लक्ष्मीपूजन करताना या गोष्टीही ठेवा लक्षात 

View post on Instagram
 
  • दिव्यांची संख्या आपण आपल्या ईच्छेनुसार वाढवू शकता. कमीत कमी पाच दिवे नक्कीच लावा. जर आपणास पाचहून अधिक दिवे लावायचे असतील तर 11, 21 किंवा 31 अशा संख्येप्रमाणे दिवे लावावेत.
  • नैवेद्यासाठी पंचामृत, फळ, खीर, सुकामेवा, बताशे, ऊस इत्यादी गोष्टींचाही यादीत समावेश करावा. या सर्व गोष्टी (Diwali Puja Samagri) घरामध्ये पूजेच्या एकदिवस आधीच आणून ठेवा.
  • लक्ष्मीपूजनासाठी स्वच्छ कपडे परिधान करा. शक्य असल्यास पूजा करण्यापूर्वी स्नान करून घ्या. अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन केल्यास घरातील सुख-समृद्धीत वाढ होत राहील.

आणखी वाचा

Diwali 2023 Remedies : धनलाभासाठी दिवाळीत करा हे 10 उपाय

Diwali 2023 : दिवाळीला या 10 ठिकाणी का लावावे दिवे? जाणून घ्या फायदे

Diwali 2023 : सावधान! या 8 चुका केल्या तर लक्ष्मी माता होईल नाराज

DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.