Diwali 2023 Remedies : धनलाभासाठी दिवाळीत करा हे 10 उपाय
दिवाळीच्या दिवशी धनलाभासाठी केलेल्या उपायामुळे लवकरच शुभ फळ मिळते, असे मानतात. कोणकोणते उपाय केल्यास लाभ मिळतील? जाणून घेऊया.
दिवाळीत लक्ष्मीपूजनादरम्यान अख्ख्या हळदीचाही पूजा साहित्यात समावेश करावा. पूजेनंतर ते लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवावे. यामुळे घराच्या सुखसमृद्धीत वाढ होते.
दिवाळीच्या पूजेसाठी वापरलेल्या अक्षता एका पुडीत बांधून आपल्या पर्समध्ये ठेवा. यामुळे तुमच्या खिशातील पैसे कधीही कमी होणार नाही आणि यश प्राप्तीही होईल.
घराच्या आसपास पिंपळाचे झाड असेल तर दिवाळीच्या संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावा व देवी लक्ष्मीला आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी आमंत्रित करा. यामुळे सुख-समृद्धीत वाढ होईल.
लक्ष्मीपूजनामध्ये गोमती चक्र देखील ठेवा. यानंतर ते आपल्या तिजोरी किंवा लॉकरमध्ये ठेवावे. यामुळे व्यवसायाची वाढ होण्यास मदत मिळू शकते.
स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या राशीनुसार देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा. जप करताना स्फटिक माळेचा वापर करावा.
लक्ष्मीपूजनादरम्यान श्री यंत्राचीही पूजा करावी. यानंतर हे यंत्र आपल्या देव्हाऱ्यात ठेवून त्याची नियमित पूजा करा. यामुळे जीवनात पैशांची चणचण निर्माण होणार नाही.
दिवाळीच्या रात्री 12 वाजेनंतर स्नान करून लाल रंगाचे वस्त्र परिधान करून देवी लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर बसून श्री सूक्त पठण करावे. या उपायामुळे गरिबी लवकर दूर होण्यास मदत मिळू शकते.
दीपावलीच्या रात्री 12 वाजेनंतर गाईच्या दुधात केशर मिक्स करून देवी लक्ष्मी व भगवान विष्णूचा अभिषेक करावा. यासह लक्ष्मी मंत्राचा जप करावा. हा उपाय केल्यास सर्व ईच्छा पूर्ण होतील.
दिवाळीच्या दिवशी एकाक्षी नारळाची पूजा करून लाल वस्त्रात श्रीफळ गुंडाळून किचनमध्ये ठेवा. यामुळे घरात धान्याची कमतरता कधीही भासणार नाही.
धार्मिक ग्रंथांनुसार बेल वृक्षाच्या मुळामध्ये धनाची देवता कुबेराचे स्थान असते. दिवाळीच्या रात्री या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा. यामुळे जीवनात यश प्राप्ती होईल.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.