Marathi

Diwali 2023

Diwali 2023 : दिवाळीला या 10 ठिकाणी का लावावे दिवे? जाणून घ्या फायदे

Marathi

शुभ दीपावली

दीपावलीच्या संध्याकाळी घरातील काही ठराविक ठिकाणी नक्की दिवे लावावे. कारण यामुळे तुमचे भाग्य उजळण्यास मदत मिळू शकते. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credits: Getty
Marathi

घराचा मुख्य दरवाजा

घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दिवे लावा. यामुळे धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात प्रवेश करून सुख-समृद्धीचा आशीर्वाद देते.

Image credits: Getty
Marathi

घराच्या मध्यभागी

घराच्या मध्यभागी जे स्थान असते ते ब्रह्म स्थान असते. वास्तूतील ही जागा महत्त्वाची मानली जाते. दीपावलीला येथे नक्की दिवा लावा. यामुळे शांती लाभते.

Image credits: Getty
Marathi

तुळशीचे रोप

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपास खूप महत्त्व आहे. दिवाळीत या रोपाजवळ नक्की दिवा लावा. तुमच्या घरामध्ये रोप नसेल तर आसपास असणाऱ्या तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा.

Image credits: Getty
Marathi

स्वयंपाकघर

किचन हा घराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. येथे धान्यलक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे येथेही एक दिवा लावावा.

Image credits: Getty
Marathi

घराचे छत

घराचे छत अंधारात न ठेवता तेथेही एक दिवा लावा. एकापेक्षा अधिक दिवेही आपण लावू शकता. पण कोणतीही दुर्घटना घडणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी.

Image credits: Getty
Marathi

पाण्याची जागा

घरात जेथे पिण्याचे पाणी ठेवता, ते पितरांचे स्थान असल्याचे मानले जाते. येथेही एक दिवा नक्की लावा. यामुळे पितरांच्या आत्म्यास शांती लाभते.

Image credits: Getty
Marathi

घराजवळील मंदिर

घराजवळील मंदिरात जाऊन पूजा करा व तिथेही एक दिवा लावा. यामुळे तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल.

Image credits: Getty
Marathi

पिंपळाचे झाड

हिंदू धर्मामध्ये पिंपळाचे झाड पूजनीय वृक्ष मानले जाते. या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो, असे म्हणतात. दिवाळीत या झाडाजवळही दिवा लावा.

Image credits: Getty
Marathi

बेलाचे झाड

बेलाच्या झाडाचे मूळ हे कुबेरदेवाचे स्थान मानले जाते. या ठिकाणी दिवा लावल्यास धनाची देवता कुबेराची तुमच्यावर कायम कृपादृष्टी राहील.

Image credits: Getty
Marathi

विहीर

घराच्या आसपास विहीर असल्यास तेथेही एक दिवा लावा. यामुळे तुमच्या जीवनातील दुःख-कष्ट दूर होण्यास मदत मिळू शकते.

Image credits: Getty
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Getty