Ram Mandir Ayodhya : श्री रामाचे हे 11 मंत्र करू शकतात प्रत्येक दुःख दूर, 22 जानेवारीला करा जप

| Published : Jan 16 2024, 11:49 AM IST / Updated: Jan 16 2024, 10:26 PM IST

ram mantra
Ram Mandir Ayodhya : श्री रामाचे हे 11 मंत्र करू शकतात प्रत्येक दुःख दूर, 22 जानेवारीला करा जप
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Ram Mandir Ayodhya : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रभू श्री राम यांच्या मंत्रांचा जप करणे शुभ ठरू शकते. जाणून घेऊया सविस्तर माहिती…

Prabhu Shree Ramache Mantra : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील भव्य श्री राम मंदिरामध्ये (Ram Mandir Ayodhya) रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज पाहुणे उपस्थिती दर्शवणार आहेत. यानिमित्त देशभरात अनेक धार्मिक विधि पार पाडल्या जाणार आहेत. यज्ञ-होम-हवन आणि पूजा देखील करण्यात येणार आहेत.

प्रभू श्री राम यांची कृपा- आशीर्वाद मिळवण्यासाठी मंत्राचा जप करणे हा देखील एक सोपा उपाय ठरू शकतो. 22 जानेवारीला अयोध्येतील श्री राम मंदिराच्या (Ram Mandir Ayodhya) उद्घाटनाच्या वेळेस काही मंत्रांचा जप (Prabhu Shree Ramache Mantra) केल्यास जीवनातील दुःख दूर होण्यास मदत मिळू शकते, असे म्हणतात. श्री रामाचे मंत्र व या मंत्रांचा जप (Prabhu Shree Ramache Mantra) करण्याची पद्धत, आपण जाणून घेऊया…

प्रभू श्री राम यांचे 11 मंत्र (Prabhu Shree Ramache Mantra)

1. रां रामाय नम:

2. ॐ जानकी वल्लभाय स्वाहा

3. ॐ नमो भगवते रामचंद्राय

4. ॐ रामाय धनुष्पाणये स्वाहा:

5. श्रीराम शरणं मम्।

6. ॐ रामचंद्राय नम:

7. ॐ रामभद्राय नम:

8. श्रीराम जय राम, जय-जय राम

9. ॐ दशरथाय विद्महे सीता वल्लभाय धीमहि तन्नो श्रीराम: प्रचोदयात्

10. राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥

11. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥

मंत्रांचा जप अशा पद्धतीने करा (Mantrancha Jap Karnyachi Padhat) 

  • 22 जानेवारीला सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. घरामध्ये स्वच्छ ठिकाणी श्री राम यांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी.
  • सर्वप्रथम विधिनुसार श्री राम यांची पूजा करावी. अबीर, गुलाल, हळद- कुंकू, फळे, फुले इत्यादी गोष्टी अर्पण करा आणि शुद्ध तुपाचा दिवा लावावा.
  • वरील नमूद केलेल्या कोणत्याही एका मंत्राचा जप (Prabhu Shree Ramache Mantra) करण्यास सुरुवात करा. मंत्राचा जप सुरू असताना दिवा तेवत राहणे गरजेचे आहे. जप करण्यासाठी तुळशीच्या माळेचा उपयोग करावा.
  • मंत्राच जप (Prabhu Shree Ramache Mantra) करताना मनावर नियंत्रण ठेवावे. मंत्र जप करताना मन शांत ठेवून जपाच्या अक्षरावर लक्ष ठेवावे. म्हणजे आपोआप प्राणायाम साधला जातो.
  • कमीत कमी पाच वेळा माळेचा जप करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने जप केल्यास जीवनातील दुःख दूर होण्यास मदत मिळू शकते.

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा :

Ayodhya Ram Mandir सोन्यासारखे चमकेल श्री राम मंदिर, नवीन फोटो पाहिले?

VIRAL VIDEO : जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थिनीने गायले राम भजन, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Ram Mandir Pran Pratishta : मॉरिशस सरकारची मोठी घोषणा, 22 जानेवारीला मिळणार 2 तासांची विशेष सुटी